Share

BMC Exit Poll: ‘मातोश्री’ला धक्का? ठाकरेंचा 25 वर्षांचा गड पडणार? आकडेवारीने उडवली खळबळ

मुंबई महानगरपालिकेच्या एक्झिट पोलनुसार भाजप-शिंदे युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. २५ वर्षांची ठाकरेंची सत्ता संपुष्टात येणार का? वाचा धक्कादायक आकडेवारी.

Published On: 

BMC Exit Poll

🕒 1 min read

विशेष प्रतिनिधी – मुंबईवर कुणाचं राज्य? गेली २५ वर्षे अभेद्य असलेला ‘मातोश्री’चा गड आता खरोखरच ढासळणार का? मुंबई महानगरपालिकेसाठी झालेलं मतदान आणि त्यानंतर समोर आलेले BMC Exit Poll पाहिल्यावर राजकीय वर्तुळात अक्षरशः भूकंप झाल्यासारखी परिस्थिती आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडताच जे आकडे समोर आलेत, ते उद्धव ठाकरेंची झोप उडवणारे आणि भाजप-शिंदे गटाला दिलासा देणारे आहेत. जर हे अंदाज खरे ठरले, तर मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ निश्चित मानली जात आहे.

१५ जानेवारीला मुंबईकरांनी आपला कौल मतपेटीत बंद केला. निकाल उद्या जाहीर होईल, पण त्याआधी आलेल्या ‘जनमत’, ‘अॅक्सिस माय इंडिया’ आणि ‘JVC’ यांसारख्या प्रमुख संस्थांच्या एक्झिट पोल्सनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास, भाजप-शिंदे युतीला मुंबईत १३० ते १५० च्या घरात जागा मिळताना दिसत आहेत. दुसरीकडे, ठाकरेंची शिवसेना आणि काही ठिकाणी मनसेचा फॅक्टर गृहीत धरूनही त्यांना दुहेरी आकडा गाठताना दमछाक करावी लागत असल्याचं चित्र आहे.

विशेष म्हणजे, Axis My India च्या पोलनुसार महायुतीला तब्बल ४२% मतदान मिळण्याचा अंदाज आहे. तर ठाकरे गट आणि मनसे मिळूनही ३२ टक्क्यांवर थांबले आहेत. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला जेमतेम १५-२० जागांवर समाधान मानावं लागेल, असं हे पोल्स सांगत आहेत. ‘रुद्र रिसर्च’ने तर ठाकरेंच्या युतीला अवघ्या ७१ जागांचा अंदाज वर्तवला आहे.

अर्थात, हे केवळ अंदाज आहेत. ‘एक्झिट पोल’ अनेकदा ‘एक्झॅक्ट पोल’ ठरतातच असं नाही. पण एक गोष्ट नक्की, या आकड्यांमुळे शिंदे-फडणवीस गोटात जल्लोष सुरू झालाय, तर ठाकरे गटात चिंतेचं वातावरण आहे. आता उद्या दुपारपर्यंत मुंबईचा ‘बॉस’ कोण हे स्पष्ट होईलच, पण तोपर्यंत ही आकडेवारी अनेकांचं ब्लड प्रेशर वाढवणारी ठरली आहे.

Election BMC Exit Poll 2026 

JVC BMC Exit Poll : 

भाजप शिंदे – 138
ठाकरे- मनसे – 59
काँग्रेस-वंचित – 23
इतर – 7

मतांची टक्केवारी किती?

महायुती : 42-45%
शिवसेना ठाकरे- मनसे : 34-37%
काँग्रेस- वंचित : 13-15%
इतर : 6-8%

Lokshahi Rudra Research BMC Exit Poll :

भाजप शिवसेना – 121

शिवसेना ठाकरे- मनसे – 71

काँग्रेस वंचित – 25

इतर – 10

Axis My India BMC Exit Poll :
भाजप शिंदे – 131- 151
ठाकरे- मनसे – 58-68
काँग्रेस-वंचित – 12-16
इतर – 6-12

मतदानाची टक्केवारी कशी?

भाजप शिंदे – 42%
ठाकरे- मनसे – 32%
काँग्रेस-वंचित – 13%
इतर – 13%

JDS BMC Exit Poll : 
भाजप शिंदे – 127-154
ठाकरे- मनसे – 44-64
काँग्रेस-वंचित – 16-25
इतर – 09-17

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या