🕒 1 min read
Manikrao Koakate । कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच चर्चेमध्ये आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे नाशिकच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी बोलताना कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
कर्जाच्या पैशांमधून लग्न, साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी एका शेतकऱ्याला म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून तसेच जनतेतून देखील तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. दरम्यान, त्यांनी या वक्तव्याबाबत माफीही मागितली आहे. अशातच आता त्यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे.
Manikrao Kokate Made Controversial Statement About Farmers
‘एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात’, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
“एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे, दुप्पट तिप्पट ठीक पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले, तर कांद्याचे बाजारभाव पडणारच, असं म्हणत माणिकराव कोकाटेंनी कांद्याच्या बाजारभावावरुन शेतकऱ्यांना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “अतिउत्तम ! ED आणि ACB आता गुंडाळून टाका”; अमित शाहांच्या दौऱ्यावर Anjali Damania यांची टीका
- “त्यांच्या पैशावर नाचणारी महिला…”; Karuna Munde यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
- “मंगेशकर कुटुंब माणुसकीला कलंक”; तनिषा भिसे मृत्यूप्रकरणावरून Vijay Wadettiwar यांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








