Share

“कोकाटेंनी केलेली सरकारची फसवणूक कोर्टाला… “, Jitendra Awhad यांचा सवाल

by MHD
Jitendra Awhad targeted Manikrao Kokate

Jitendra Awhad । मागील काही दिवसांपासून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा तसेच 50 हजार दंड ठोठावला होता.

पण नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या अपात्रतेला स्थगिती दिली आहे. कोकाटे यांना अपात्र ठरवल तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल आणि पैसे खर्च होईल असे निरीक्षण कोर्टाने मांडले आहे.

“मागील 35 वर्षांपासून कोकाटे लोकप्रतिनिधी असून लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. जर त्यांना अपात्र ठरवले तर पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागेल आणि त्यात जनतेचे पैसे खर्च होतील,” असे निरीक्षण जिल्हा न्यायाधीश नितीन जीवने यांनी नोंदवले.

यामुळे माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, या निकालावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधत कोर्टाला सवाल विचारला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापू शकते.

Jitendra Awhad on Manikrao Kokate

“माणिकराव कोकाटे यांनी सरकारला फसवलं आहे. ही फसवणूक कोर्टाला मान्य आहे का? निवडणुकीतील खर्चाची काळजी करण्याचे कोर्टाचे काम नाही. कोर्टाने नको तिथे लक्ष घालू नये. त्यांनी गुन्हा केला की नाही एवढं महाराष्ट्र्राला सांगा. खर्च कोर्टाच्या खिशातून देणार का? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Manikrao Kokate has received a big relief from the court. However, Jitendra Awhad has targeted him.

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now