मुंबईतील राज-उद्धव ठाकरेंच्या ‘विजयी मेळाव्या’त काँग्रेसची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

Congress’s absence from the Raj Thackeray-Uddhav Thackeray rally in Mumbai fuels debate.

Published On: 

Raj Thackeray, Uddhav Thackeray

मुंबई: आज मुंबईत पार पडलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित ‘विजयी मेळाव्या’ला काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याने हजेरी न लावल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. हा मेळावा राजकीय नसल्याने, ठाकरे बंधूंनी सर्व पक्षांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती, मात्र काँग्रेसचा एकही मोठा चेहरा व्यासपीठावर दिसला नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे घेतलेल्या या मेळाव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन्ही बंधू पुन्हा एकत्र येत असल्याने या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीतील एक प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसच्या अनुपस्थितीने अनेक प्रश्न निर्माण झालेआहेत.

Raj Thackeray-Uddhav Thackeray in Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी या मेळाव्यास उपस्थिती लावत आघाडीतील एकसंधता दर्शवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे आघाडीमध्ये सर्व आलबेल आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

या दांडीमागे नेमके काय कारण आहे, याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसने जाणीवपूर्वक हा मेळावा टाळला की, त्यांची अनुपस्थिती ही पूर्वनियोजित रणनीतीचा भाग आहे, यावर राजकीय विश्लेषकांकडून चर्चा सुरू झाली आहे. या घटनेचे पडसाद आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात उमटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही