Share

बहिणींच्या संसाराचा बळी देणारे, दारूड्यांचं सरकार आहे का? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

Jitendra Awhad slams Maharashtra govt over 328 new liquor sale licenses

Published On: 

Jitendra Awhad criticized Ajit Pawar from Guardian Minister post

मुंबई: महसूल वाढवण्याच्या नावाखाली राज्य सरकारने ३२८ नवीन मद्यविक्री परवाने देण्याचा घेतलेला निर्णय सध्या राजकीय वर्तुळात वादग्रस्त ठरत आहे. एका कंपनीला ८ परवाने देण्याची मुभा देण्यात आली असून, नवीन परवान्यासाठी केवळ १ कोटी रुपयांचे शुल्क ठेवण्यात आले आहे. यापूर्वी अशा परव्यासाठी १० कोटी रुपये मोजावे लागत होते.

या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. “बहिणींच्या संसाराचा बळी देणारे सरकार हेच का नव्या महाराष्ट्राचं चित्र?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

Jitendra Awhad over liquor licenses

“लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे म्हणून त्यांचे पती आणि भाऊ बेवडे करण्याचं सरकारने ठरवलं आहे. हे सरकार ‘वाजले की बारा’ याच दिशेने देश आणि राज्य नेण्याच्या तयारीत आहे,” असा घणाघात आव्हाड यांनी केला. आर्थिक शिस्त घालवली आहे. सत्तेची झिंग एवढी आहे की तुम्ही महाराष्ट्राला दारूचा बाजार बनवताय,” असे म्हणत त्यांनी सरकारचा निषेध केला.

दारूच्या ४७ कंपन्या चालवताय, कुणाच्या आशीर्वादाने? दारूड्याचं सरकार आहे की बेवड्याचं? पाणी मिळालं नाही तरी चालेल, पण घराघरात दारू मिळेल असं सरकार चालवायचं आहे का?” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

“पैसे कमवायचे असतील तर किल्ले विकून टाका, गेटवे विकून टाका. पण दारू विक्रीच्या नावाखाली राज्य उद्ध्वस्त करू नका,” असं सांगताना त्यांनी माजी मंत्री दत्ता भरणे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. “लाडक्या बहिणींना घेऊन चंद्रभागेत ढकलून द्या,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी (Jitendra Awhad ) दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही