🕒 1 min read
पुणे: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिला आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार असून, मागील आंदोलनाच्या तुलनेत पाचपट जास्त लोक सहभागी होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
सरकारकडून मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे जरांगे पाटील संतप्त झाले आहेत. “गेल्या पंधरा दिवसांमध्ये हजारो नोंदी मिळाल्या असूनही प्रमाणपत्र दिलं जात नाही. सरकार जाणूनबुजून वेळकाढूपणा करत आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
Manoj Jarange Maratha Reservation Ultimatum for Mumbai Protest
“ज्यांना आपण निवडून दिलं, तेच आज आरक्षणावर मौन बाळगून आहेत. आम्ही मरू पण माघार घेणार नाही, विजय मिळवूनच मागे फिरू,” असा ठाम निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला. समाजातील लोकांना मतभेद विसरून मुंबईत दोन दिवसांसाठी येण्याचे आवाहनही त्यांनी केलं.
फडणवीस सरकारला सळो की पळो करू!
“आंतरवाली बैठकीच्या दिवशीही लोकांची गर्दी इतकी होती की जागा अपुरी पडली. आता मुंबईत काय होईल, याचा अंदाज देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) घ्यावा,” असा टोला त्यांनी लगावला. २९ ऑगस्टपूर्वी सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शिरसाटांवर थेट निशाणा: “डबल गेम खेळू नका”
या आंदोलनात जरांगे पाटलांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावरही टीका केली. “राज्यातील मराठा विद्यार्थ्यांची व्हॅलिडीटी थांबलेली आहे. माझ्या मुलांचंही नुकसान झालंय. शिरसाट हे मराठा समाजाशी ‘डबल गेम’ खेळत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी शिरसाट यांना तीन वेळा फोन करून सूचना दिल्या, पण काहीच उपयोग झालेला नाही. “जर तुमच्याकडूनच अडथळे येणार असतील, तर मग समाजाच्या रोषापासून तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींचे बूट चाटले का? रामदास कदमांचा घणाघात
- ‘पैशांसाठी काही अडलं नाही, बॅग पाठवून देतो!’ संजय शिरसाट पुन्हा वादात
- प्रसिद्ध हल्दीराम समूहाला ९ कोटींचा गंडा; मुंबईतील व्यापाऱ्यांकडून फसवणूक









