🕒 1 min read
नागपूर | देशभरात प्रसिद्ध असलेल्या हल्दीराम समूहाची तब्बल ९ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील चार व्यापाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘रॉयल फूड इंडस्ट्री’ या नावाची कंपनी असल्याचे भासवून ही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
समीर अब्दुल हुसेन लालानी, त्यांची पत्नी हिना लालानी, मुलगा आलिशान लालानी आणि भागीदार प्रकाश भोसले यांनी मिळून रॉयल फूड इंडस्ट्री नावाची बनावट कंपनी सादर केली. कंपनीची १५ कोटींची उलाढाल असल्याचा बनाव करून आणि मोठा कच्चा माल असल्याचा आभास निर्माण करत त्यांनी हल्दीराम ( Haldiram ) समूहाची विश्वासार्हता मिळवली.
Haldiram Group Cheated of ₹9 Crore
त्यांनी गुंतवणुकीच्या बदल्यात कंपनीतील समभाग देण्याचे आमिष दाखवले. मात्र गुंतवणूक झाल्यानंतरही समभाग न दिल्याने हल्दीराम ( Haldiram ) समूहाला फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकारामुळे व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कर वाढीच्या निषेधार्थ उद्या विदर्भातील सर्व बार-परमिट रूम बंद
राज्य सरकारने बार आणि परमिट रूमवरील कर वाढवल्याच्या विरोधात नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनने १४ जुलै रोजी बंद पुकारला आहे. याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, तर बार आणि परमिट रूम कायमस्वरूपी बंद करण्यात येतील आणि त्यांच्या चाव्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवल्या जातील.
प्रमुख मागण्या काय?
- वाढवलेली व्हॅट, नूतनीकरण फी आणि एक्साईज ड्युटी कमी करावी
- मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील
📌 महत्वाच्या बातम्या
- म्हाडाकडून ५,२८५ घरांची आणि ७७ भूखंडांची सोडत जाहीर; अर्ज नोंदणीला सुरुवात
- पहाटे ६ वाजता अजित पवार थेट रस्त्यावर; म्हणाले, ‘जे आडवं येईल त्याला उचला!’ पुण्यात धडक कारवाई
- लोकसभेतील पराभवानंतर थेट राज्यसभेवर! उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










