Share

म्हाडाकडून ५,२८५ घरांची आणि ७७ भूखंडांची सोडत जाहीर; अर्ज नोंदणीला सुरुवात

MHADA announces lottery for 5,285 homes and 77 plots

Published On: 

MHADA announces lottery for 5,285 homes and 77 plots

🕒 1 min read

मुंबई | स्वतःचं घर मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाकडून ( MHADA lottery ) आनंदाची बातमी आहे. कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने ठाणे, वसई, ओरोस, बदलापूर आणि अन्य भागांत ५,२८५ घरांसह ७७ भूखंडांच्या सोडतीची घोषणा करण्यात आली आहे. ही सोडत सोमवार, १४ जुलैपासून ‘गो-लाइव्ह’ होत असून, त्याच दिवशी दुपारी १ वाजता अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

या सोडतीत विविध योजनांच्या अंतर्गत घरांचा समावेश असून, यामध्ये २०% सर्वसमावेशक योजना, १५% एकात्मिक शहर योजना, कोकण मंडळ गृहनिर्माण योजना, तसेच “जशा स्थितीत” असलेल्या सदनिकांचाही समावेश आहे. याशिवाय ५०% परवडणाऱ्या श्रेणीतील सदनिकाही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. भूखंड खरेदीसाठी इच्छुकांसाठी हे एक उत्तम यशस्वी व्यासपीठ ठरणार आहे.

MHADA Lottery 2025 Apply online

अर्जासाठी महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरुवात: १४ जुलै २०२५, दुपारी १ वाजता

अर्ज अंतिम तारीख: १३ ऑगस्ट २०२५, रात्री ११.५९

अनामत रक्कम अंतिम तारीख: १४ ऑगस्ट २०२५, रात्री ११.५९

प्रारूप यादी: २१ ऑगस्ट २०२५

अंतिम यादी: १ सप्टेंबर २०२५

सोडत: ३ सप्टेंबर २०२५, सकाळी १० वाजता, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे

म्हाडाने यंदा ‘IHLMS 2.0’ प्रणालीद्वारे अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जदारांना Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवरून अर्ज करता येणार असून, अधिकृत संकेतस्थळावर मार्गदर्शक व्हिडिओ, हेल्प फाईल्स आणि संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

म्हाडाच्या कोणत्याही योजनेसाठी कोणतेही एजंट, सल्लागार अथवा मध्यस्थ नियुक्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही फसवणुकीस बळी पडू नये, असा इशारा म्हाडाच्या ( MHADA lottery ) कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai

Join WhatsApp

Join Now