Share

उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींचे बूट चाटले का? रामदास कदमांचा घणाघात

Ramdas Kadam slams Uddhav over “boot licking” remark by Sanjay Raut.

Published On: 

Ramdas Kadam targets Uddhav Thackeray due to Rajan Salvi entry into Eknath Shinde group

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर ‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरातून खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केलेल्या टीकेनंतर, शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. शिंदे दिल्लीला का गेले, यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राऊतांवर निशाणा साधत कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यपद्धतीवरच टीकास्त्र सोडलं.

Ramdas Kadam slams Uddhav Thackeray

रामदास कदम म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालय केवळ दोन वेळा गाठलं. राऊत यांच्यावर पलटवार करताना कदम म्हणाले, “संजय राऊत म्हणतात शिंदे मोदींचे बूट चाटायला गेले. पण उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना भेटायला गेले, तेव्हा सर्व पक्षांच्या नेत्यांना बाहेर थांबायला लावलं, आणि मोदींसोबत एकटेच चर्चा केली. तेव्हा त्यांनी बूट चाटले होते का?”

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट भाजप व उत्तर भारतीयांवर आरोप करत असल्याचं कदम म्हणाले. “महानगरपालिका मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे काहीही करतील. पण शेवटी मुंबईवर भगवाच फडकणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“हातात रुद्राक्ष घातल्याने कोणी बाळासाहेब होत नाही. उद्धव ठाकरे स्वतःला बाळासाहेब समजायला लागले आहेत,” अशी जहरी टीका करत रामदास कदम यांनी अनेक गोष्टींचे खुलासे वेळ आली करेल असा इशारा दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही