🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर | राज्याचे मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा त्यांच्या मिश्किल आणि बोलक्या शैलीमुळे चर्चेत आले आहेत. “पैशांची चिंता करू नका, आम्हीच पैसे देणारे आहोत. गरज लागली तर एखादी बॅगही पाठवतो!” असे विधान त्यांनी ( Sanjay Shirsat ) छत्रपती संभाजीनगरमधील कॅन्सर हॉस्पिटलच्या कार्यक्रमात केलं. त्यांच्या या उद्गारावर सभागृहात हशा पिकला, पण राजकीय वर्तुळात मात्र चर्चेचा नवा धूर उठला आहे.
Sanjay Shirsat’s “Money Bag” Remark
कार्यक्रमात बोलताना शिरसाट म्हणाले, “पैशांसाठी काही अडलं असं समजण्याचं कारण नाही. पैसे देणारे आम्हीच आहोत. आजकाल आमचं नाव खूप चालतंय. त्यामुळे पैशांची चिंता नको, गरज लागली तर बॅग पाठवतो!” त्यांच्या या ओघवत्या भाष्याने उपस्थितांमध्ये क्षणभर हलकाफुलका वातावरण निर्माण झाला.
या विधानापूर्वीच संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात ते फोनवर बोलताना एका बेडवर बसलेले असून त्यांच्या बाजूला एक मोठी बॅग ठेवलेली दिसत आहे. या व्हिडिओवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी जोरदार टीका करत, “मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत”, असा आरोप केला होता.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले, “तो व्हिडिओ माझ्या घरातला आहे, बेडरूममधला आहे. माझा कुत्रा, माझी बॅग सगळं घरचं आहे. एवढी मोठी बॅग जर पैशांची ठेवायची असेल तर अलमारी मेलीय का? यात कपडे होते, पैसे नाहीत,” असं स्पष्ट करत त्यांनी ( Sanjay Shirsat ) आरोप फेटाळले.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध हल्दीराम समूहाला ९ कोटींचा गंडा; मुंबईतील व्यापाऱ्यांकडून फसवणूक
- म्हाडाकडून ५,२८५ घरांची आणि ७७ भूखंडांची सोडत जाहीर; अर्ज नोंदणीला सुरुवात
- पहाटे ६ वाजता अजित पवार थेट रस्त्यावर; म्हणाले, ‘जे आडवं येईल त्याला उचला!’ पुण्यात धडक कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










