Dhananjay Deshmukh । धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकरने (Dada Khindkar) तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तो स्वतः पोलिसांना शरण आला होता. खिंडकर आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते (Parmeshwar Satpute) यांनी भाष्य केले होते.
“याबाबतीत आम्ही एक शब्दही बोलणार नव्हतो. खिंडकर यांनी माध्यमांना सांगितले होते की, तो प्रश्न गावातला आहे. यात संतोष देशमुख प्रकरणाचा संबंध नाही आणि तो लावू नये,” असे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.
“परमेश्वर सातपुते यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला काही रस नाही. राज्यात आंदोलन पेटले असताना आणि सगळे न्यायाच्या भूमिकेत असताना सातपुते यांनी केलेले विधान चुकीचे आहे. त्यांनी माझ्या कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो,” असे देशमुख म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “सातपुते यांनी मोठी चूक केली आहे. दादासाहेबांबद्दल बोलताना त्यांनी लग्नाबद्दल प्रश्न उपस्थित केले. बीडला दत्त मंदिरामध्ये लग्न झालं होतं, पत्रिका छापलेल्या होत्या. तरीही त्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केले,” असे धनंजय देशमुख म्हणाले.
Dhananjay Deshmukh on Parmeshwar Satpute
“ओंकार सातपुते याने दादा खिंडकरच्या पत्नीला शिव्या दिलेल्या होत्या. चुकीचं बोलला होता, त्या कारणामुळे हे भांडण झाले, हे मला प्रथमदर्शनी समजले आहे. त्यामुळे आता तपासामध्ये आणखी खुलासे होतील,” असाही दावा देशमुखांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :