Ajit Pawar । देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्री आहेत. परंतु, लवकरच राज्याचा मुख्यमंत्री बदलणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेसच्या बड्या नेत्याने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.
“अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची महायुती सरकारमध्ये अवस्था फार वाईट आहे. पुढील काळात त्यांचा पक्ष टिकेल की नाही माहीत नाही. पण भाजप (BJP) त्यांना जगू देत नाही. अजित पवार यांनी सादर केलेले बजेट त्यांच्या मनातील बजेट नाही,” असा टोला काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला आहे.
“आम्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून त्यांनी आमच्यासोबत यावे. आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने आम्ही त्यांची काळजी घेऊ. आम्ही अजित पवार यांना काही दिवस तर एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री बनवू,” अशी ऑफर पटोले यांनी दिली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्प सादर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकारपरिषद घेतली होती. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी केलेलं वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते. अशातच आता पटोले यांनी थेट पवार आणि शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.
Nana Patole offer to Ajit Pawar and Eknath Shinde
पटोले यांच्या विधानाची आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. त्यामुळे आता नाना पटोले यांनी दिलेली ऑफर एकनाथ शिंदे आणि अजित पवार स्वीकारणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. जर त्यांनी ही ऑफर स्वीकारली तर राज्यात पुन्हा सत्ताबदल झालेली पाहायला मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या :