Starlink Internet । सध्याच्या काळात इंटरनेट ही महत्त्वाची गरज बनली आहे. प्रत्येक कामासाठी मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करण्यात येत आहे. जसजशी इंटरनेटची मागणी वाढत चालली आहे, तसतसे इंटरनेट पुरविणाऱ्या कंपन्या सेवांचे दर वाढवत आहेत.
अशातच आता एअरटेल (Airtel) आणि रिलायन्स जिओ (Reliance Jio) या कंपन्या स्टारलिंक (Starlink ) या कंपनीबरोबर करारबद्ध झाल्या आहेत. एअरटेल आणि रिलायन्स जिओची ग्रामीण आणि दुर्गम भागात फायबर कनेक्टिव्हिटी नाही. पण स्टारलिंक इंटरनेट भारतात आले तर ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी मजबूत होईल.
किमतीचा विचार केला तर स्टारलिंकच्या प्लॅन्सची किंमत (Starlink Internet Price) पारंपारिक ब्रॉडबँड सेवांच्या तुलनेत जास्त असेल. उदाहरणार्थ, भूतानमध्ये स्टारलिंकच्या प्लॅनची किंमत 3,000 रुपये ते 4,200 रुपये दरम्यान आहे. भारतातही हीच किंमत 3,500 रुपये ते 4,500 रुपये पर्यंत असू शकते.
ही सेवा अद्याप भारतात सुरु झाली नाही पण सेवा सुरु झाल्यानंतर तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल तर स्टारलिंक डिश आणि राउटरची आवश्यकता असेल. ही डिश जवळच्या स्टारलिंक सॅटेलाइट क्लस्टरशी आपोआप कनेक्ट होईल.
Elon Musk signs deal with Airtel and Jio
2002 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली असून वापरकर्त्यांना इंटरनेट वितरीत करण्यासाठी कंपनी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांच्या नेटवर्कचा वापर करते. हे लक्षात घ्या की स्टारलिंकचा वेग 150 एमबीपीएसपर्यंत असण्याची शक्यता आहे. जो पारंपारिक सॅटेलाइट इंटरनेट पेक्षा खूप चांगला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले