Jio । रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. अशातच आता कंपनीने आयपीएल (IPL 2025) सुरु होण्यापूर्वी एक शानदार प्लॅन (Jio plan) लाँच केला आहे.
किमतीचा विचार केला तर या प्लॅनची किंमत फक्त 100 रुपये (Jio recharge plan) आहे. हे लक्षात घ्या की हा एक नवीन डेटा-ओन्ली रिचार्ज प्लॅन असून ज्यात 90 दिवसांचा जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन (JioHotstar Subscription Price) आणि 5 जीबी डेटा मिळेल. हा प्लॅन Jio.com वर उपलब्ध आहे.
या प्लॅनमुळे वापरकर्त्यांना मोफत JioHotstar वर आयपीएलचा आनंद घेता येणार आहे. हे लक्षात घ्या की या प्लॅनवर कोणतेही कॉलिंग किंवा एसएमएस फायदे मिळत नाही. तसेच हा प्लॅन अॅक्टिव्ह करण्यासाठी अॅक्टिव्ह रिलायन्स जिओ प्रीपेड बेस प्लॅन गरजेचा आहे.
बेस प्लॅनशिवाय या प्लॅनचे फायदे लागू होणार नाहीत. तो प्लॅन व्हॅलिडिटी, डेटा आणि कॉलिंग बेनेफिट्स सह येणारा पाहिजे. किमतीचा विचार केला तर इतर नियमित जिओ हॉटस्टार मोबाईल प्लॅनची किंमत 90 दिवसांसाठी 149 रुपये इतकी आहे.
JioHotstar plan at just Rs 100
पण ग्राहकांना 100 रुपयांच्या या प्लॅनमध्ये आयपीएल 2025 सह वेब सिरीज, चित्रपट आणि लाईव्ह स्पोर्ट्स स्ट्रीम करण्याची परवानगी मिळत आहे. स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही दोन्हीवर 1080p पर्यंत रिझोल्यूशन मिळेल. त्याशिवाय जिओ हॉटस्टारच्या सुपर प्लॅनसाठी रिचार्ज प्लॅनची किंमत 299 रुपये इतकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले