Satish Bhosale । मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चांगलीच चर्चेत आली आहे. अशातच सतीश भोसले नावाच्या एका आरोपीचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अशातच आता त्याच्या साडूचा नवा कारनामा समोर आला आहे.
प्रशांत चव्हाण (Prashant Chavan) उर्फ गब्या हा सतीश भोसले याचा साडू आहे. प्रशांत चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी पाथर्डी शहरागत असणाऱ्या जमिनीवर ताबा केला होता. त्या जमिनीचा आणि पारधी समाजाचा कोणताही संबंध नसल्याने जमिनीच्या पुढील बाजूस त्यांनी पाल ठोकली.
त्यानंतर पक्के बांधकाम करून अतिक्रमण हटवायचे असल्यास एक कोटी रुपयांची मागणी केली. या प्रकरणात चव्हाण आणि त्याच्या साथीदारांविरोधात पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरण मिटवण्यासाठी सतीश भोसले याने मध्यस्थी केली असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दररोज सतीश भोसले याचे प्रताप समोर येत आहेत. यामुळे त्याला कायद्याचा धाक आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
Satish Bhosale and Prashant Chavan Property
सतीश भोसले याच्याकडे एसयुव्ही कार आहे तर प्रशांत भोसले यांच्याकडे इनोव्हा कार आहे. महत्त्वाचे म्हणजे या दोघांकडेही कोट्यवधीची संपत्ती (Satish Bhosale Property) असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? असा सवाल उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :