Satish Bhosale । सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याच्यावर दोन व्यक्तींना मारहाण केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याने हरण, ससे आणि मोरांची शिकार केल्याची देखील माहिती समोर आली होती. वनखात्याच्या जागेत अनधिकृतपणे बांधलेल्या घरावर बुलडोझर फिरवला आहे.
तसेच त्याचे पाडलेले घरही अज्ञात लोकांनी पेटवून दिले आहे. त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यादरम्यान त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. अशातच आता सतीश भोसलेने आजपासून तुरुंगात अन्नत्याग आंदोलन (Hundger Strike) सुरु केले आहे.
त्याबाबत त्याने पोलिसांना पत्र दिले आहे. कुटुंबाला मारहाण प्रकरण आणि घराला आग लावलेल्या आरोपींना अटक करावी, अशी मागणी सतीश भोसलेने पत्रात केली आहे. तसेच त्याने पत्रात मोठा खुलासा केला आहे.
“माझ्यावर 307 चा खोटा गुन्हा दाखल केला आहे. अटक केल्यानंतर माझे घर पाडले. माझ्या घरातील साहित्य काही गुंडांनी जाळले. यात जनावरांचा चारा, शेळ्या, कोंबड्या, बदक आणि काही प्राणी, जळून मृत्युमुखी पडले आहेत. घर पेटवणाऱ्यांनी माझ्या कुटुंबावर हल्ला केला आहे”, असे सतीश भोसलेने पत्रात म्हटले आहे.
Satish Bhosale Hundger strike in jail
“या घटनेने मी खूप व्यथित झालो आहे. आता माझी जगण्याची इच्छा देखील संपली आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही,” असा इशारा सतीश भोसलेने दिला आहे. त्यामुळे आता सतीश भोसलेची मागणी मान्य होते का? असा सवाल उपस्थित होतोय.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले