Supriya Sule । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणी कमी होत नाही. विरोधक सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. अशातच आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“बरं झालं पक्षात फुट पडली नाही तर जो दोन मुले असलेल्या पत्नीच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो, त्या व्यक्तीसोबत मी काम करू शकले नसते. मी विरोधी पक्षात आयुष्य काढेन पण नैतिकता सोडणार नाही,” अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
“पक्षात असतानाही धनंजय मुंडे यांच्याविरोधात माझी लढाई सुरु होती. जिथे हा माणूस असेल त्या पक्षात मी कामच करु शकत नाही. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि महादेव मुंडे (Mahadev Munde) यांची घरी भेट एकदा तरी जाऊन या, म्हणजे तुम्हाला समजेल तिथे काय परिस्थिती आहे,” असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिला.
तसेच सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर देखील टीका केली आहे. “शंभर दिवसात एक विकेट गेली असून येत्या सहा महिन्यात आणखी एक विकेट जाणार आहे. त्या मंत्र्याचं नाव आताच जाहीर करणे योग्य ठरणार नाही,” असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
Supriya Sule on Dhananjay Munde
पुढे त्या म्हणाल्या की, “जो बायकोच्या आड लपून सगळे उद्योग करतो. हिंमत असेल, तर समोर येऊ लढ. ही लढाई खूप मोठी आहे. छोट्यांना घेरण्यापेक्षा जे डबल डेंजर आहे, त्यांच्यासोबत लढण्यात खरी मजा आहे,” असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले