🕒 1 min read
Pushpa 3 । लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचा चित्रपट पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले. प्रेक्षक आता पुष्पा 3 या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याबाबत निर्मात्यांनी मोठी अपडेट दिली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘पुष्पा 2 – द रूल’ (Pushpa 2 – The Rule) रिलीज झाला. बॉक्स ऑफिसमध्ये हा चित्रपट खूप यशस्वी झाला. या चित्रपटाने सुमारे 1,750 कोटी रुपये कमावले असून तो भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर बनला. त्याचवेळी निर्माता रवी शंकर यांनी स्पष्ट केले की पुष्पा 3 – रॅम्पेज हा चित्रपट 2028 मध्ये रिलीज होईल.
चित्रपटाचे संवाद लेखक श्रीकांत विसा यांनी नुकत्याच झालेल्या मुलाखतीत असा खुलासा केला की पुष्पा 3 हा पुष्पा 2 पेक्षा खूपच मनोरंजक असेल. परंतु, या चित्रपटाबाबत अजून कोणताच खुलासा झाला नाही. कमाईचा विचार केला तर पुष्पा 2 या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले.
त्याचप्रमाणे पुष्पा 3 – रॅम्पेज हा चित्रपट 2028 मध्ये रिलीज झाल्यानंतर कमाईबाबत अनेक रेकॉर्ड मोडू शकेल, यात काही शंकाच नाही. विशेष म्हणजे पुष्पा 2: द रूल हा चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज केला होता.
बंगाली भाषेतही प्रदर्शित होणारा हा पहिलाच अखिल भारतीय चित्रपट असून तो स्मार्टफोन स्टँडर्ड, 3D, IMAX, 4DX आणि D-BOX फॉरमॅटमध्ये रिलीज केला आहे. यापूर्वी देखील दिग्दर्शक सुकुमार यांनी अल्लू अर्जुनसोबत 3 चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Pushpa 3 Rampage Release Date
प्रत्येक वेळी अल्लू अर्जन हा सुकुमार यांच्यासाठी भाग्यवान ठरला आहे. पुष्पा 2 जवळपास 500 कोटी रुपयांमध्ये बनवला होता. पण त्याने 1,750 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. प्रेक्षक आता पुष्पा 3 या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- LSG ला स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मोठा दिलासा, स्टार खेळाडू करणार कमबॅक
- COEP कडून 97 व्या रेगाटा बोट शोचं आयोजन
- Rajasthan Royals ला मोठा धक्का! ‘या’ खेळाडूवर करोडो खर्च केले पण तो…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now