Chhaava । छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा छावा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांची मुख्य भूमिका आहे. महत्त्वाचे म्हणजे छावा चित्रपटाने या वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
छावा चित्रपट रिलीज होताच पहिल्या आठवड्यातच 225.8 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 186.18 कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात 84.94 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच चौथ्या आठवड्यासह आतापर्यंत 508 कोटी रुपयांची कमाई (Chhaava Cinema Collection) केली आहे.
पाचशे कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सहभागी होणारा छावा हा 2025 मधला पहिलाच चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट आता तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.63 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
इतकेच नाही तर देशभरात अजून इतर भाषांमध्ये चित्रपट रिलिज होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईची ही घोडदौड पुढचे काही आठवडे सुरूच राहील. लवकरच हा चित्रपट गदर-2 चा (Gadar 2) रेकॉर्ड मोडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Chhaava Collection in Box Office
कमाईचा विचार केला तर गदर- 2 चित्रपटाने 525.7 कोटी रुपयांची कमाई केली होती. जर हा चित्रपट आणखी काही दिवस सिनेमागृहात राहिला तर तो अभिनेता शाहरुख खानच्या पठाण (Pathan) चित्रपटालाही मागे टाकू शकतो. पठाण चित्रपटाला मागे टाकण्यासाठी छावाला आणखी 30 कोटींची कमाई करण्याची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या :