Share

“जितकी आयुष्याची वेळ लिहिली आहे, तितकीच…”; बिश्नोईच्या धमक्यांवर Salman Khan ने सोडले मौन

Salman Khan has been receiving death threats for the past few years. Despite this, he is promoting Sikandar.

by MHD

Published On: 

Salman Khan reaction on receives threats

🕒 1 min read

Salman Khan । बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खानचा सिकंदर (Sikandar) चित्रपट 30 मार्च 2025 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana), काजल अग्रवाल, अभिनेता सत्यराज, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर यांच्यासह अनेक स्टारकास्ट असणार आहेत.

सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती रुपयांचा गल्ला जमावणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. मागील काही वर्षांपासून सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. असे असूनही तो सिकंदरचे प्रमोशन करत आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त माध्यमांशी बोलताना सलमान खानने सतत येणाऱ्या धमक्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. “देव, अल्लाह सर्वांच्यावर आहे. जितकी आयुष्याची वेळ लिहिली आहे, तितकीच आहे. फक्त अडचण इतकीच आहे की, कधी कधी इतक्या लोकांना सोबत घेऊन जावे लागते,” असे सलमान खान म्हणाला.

दरम्यान, 1998 रोजी ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना काळवीट शिकारीच्या प्रकरणामध्ये सलमान खानवर गुन्हा दाखल केला होता. बिश्नोई समाज काळविटाला पवित्र मानले जात असून या घटनेमुळे हा समाज त्याच्यावर नाराज झाला आहे.

Salman Khan breaks silence on death threats

तेव्हापासून लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) सलमानला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार देखील केला होता. इतकेच नाही तर सलमानच्या वडिलांनाही धमकीचं पत्र लिहिलं होतं. तेव्हापासून त्याच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Entertainment Marathi News

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या