Share

लखनऊ विजयाचं खातं उघडणार की Sunrisers Hyderabad दुसऱ्यांदा विजयी होणार? अशी असेल टीम

Will Lucknow open their account of victory in today’s match or will Sunrisers Hyderabad win for the second time? Fans of both teams will be paying special attention to this.

by MHD

Published On: 

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants today

🕒 1 min read

Sunrisers Hyderabad । आज आयपीएल 2025 स्पर्धेमधील सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सातवा सामना पार पडणार आहे. सनरायझर्स हैदराबादने एक सामना जिंकला आहे तर लखनऊने त्यांचा पहिलाच सामना गमावला आहे.

त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात लखनऊ (Lucknow Super Giants) विजयाचं खातं उघडणार की सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा विजयी होणार? याकडे दोन्ही संघांच्या चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबादमध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. (SRH vs LSG)

लखनऊ सुपर जायंट्स आज होणाऱ्या सामन्याासठी प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्ससमोर ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या तिघांना रोखण्याचं आव्हान असेल.

SRH vs LSG IPL 2025 Match Where To Watch On TV?

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

SRH vs LSG IPL 2025 Match Live Streaming Details

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.

Sunrisers Hyderabad Squad For IPL 2025

अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, ॲडम झाम्पा, सचिन बेबी, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, विआन मुल्डर, राहुल चहर, अथर्व तायडे, एशान मलिंगा आणि कामिंदू मेंडिस.

Lucknow Super Giants Squad For IPL 2025

एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव, मणिमरण सिद्धार्थ, अब्दुल समद, हिम्मत सिंग, राजवर्धन हंगरगेकर, आकाश महाराज सिंग, आवेश खान, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, आकाश दीप, मयंक यादव, शामर जोसेफ आणि अर्शिन कुलकर्णी.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Sports Cricket IPL 2025 Marathi News

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या