Share

रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिसवर Sikandar चा जलवा, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली बक्कळ कमाई

Advance bookings for this film have started from yesterday. Sikandar has earned good money in advance bookings.

by MHD

Published On: 

Sikandar Advance Booking Collection Day 1

🕒 1 min read

Sikandar । काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या (Salman Khan) बहूचर्चित सिकंदर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांनी केली आहे.

कालपासून या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. सिकंदरने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चांगली कमाई केली आहे. सॅक्निल्कच्या आकडेवारीनुसार सांगायचे झाले तर, सिकंदरची 67 हजार 182 तिकिटे हिंदी 2D स्वरूपात विकली आहेत.

आयमॅक्स 2D मध्ये चित्रपटाची 45 हजार 94 तिकिटं तर देशभरात चित्रपटाची 67276 तिकिटं विकली आहेत. तसेच ब्लॉक सीट्ससह, या चित्रपटाने आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 6.11 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट किती चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

सलमान खान शिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana), काजल अग्रवाल (Kajal Aggarwal), अभिनेता सत्यराज, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर यांच्यासह अनेक स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

A.R. Murugadoss reaction on Sikandar film box office collection

“गजनीप्रमाणेच सिकंदर चित्रपटामध्ये स्पेशल सरप्राईज असणार आहे. ट्रेलरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादावरून असं दिसतंय की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करेल,” असे दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही