🕒 1 min read
RR vs KKR । आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही संघांनी आपले पहिले सामने गमावले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ दुसरा सामना जिंकण्यासाठी विशेष प्रयत्न करतील.
कर्णधार रियान परागच्या (Riyan Parag) नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा संघ आणि अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स हा संघआयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दुसऱ्या लढतीसाठी मैदानात उतरत आहे. या दोन्ही संघांकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.
विजयाची माळ कोणत्या संघाच्या गळ्यात पडते? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आतापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स एकूण 29 वेळा आमनेसामने आले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी 14 सामने जिंकले आहेत. तर एक सामना निकालाविना संपला.
KKR vs RR IPL 2025 Match Where To Watch On TV?
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.
KKR vs RR IPL 2025 Match Live Streaming Details
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.
Kolkata Knight Riders Squad For IPL 2025
सुनील नरेन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन, वरुण चक्रवर्ती.
Rajasthan Royals Squad For IPL 2025
यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग (कर्णधार), नितीश राणा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, फजलहक फारुकी.
महत्त्वाच्या बातम्या :
- “एका नेपाळ्याला वाटतं मीच हिंदू धर्म वाचवू शकतो,” नितेश राणेंचे नाव न घेता Anil Parab यांचा घणाघात
- Dhananjay Deshmukh यांच्या साडूला तातडीने रुग्णालयात हलवलं, नेमकं कारण काय?
- कुणाल कामराचा आणखी व्हिडीओ व्हायरल, Narendra Modi यांच्यावर केली होती टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now







