Share

Ravindra Jadeja : ‘जड्डू’ची जादू ओसरली? अजिंक्य रहाणेने थेट शब्दांत सुनावले खडेबोल!

न्यूझीलंडविरुद्ध एकही विकेट न मिळाल्याने रविंद्र जडेजावर टीका होत आहे. आता अजिंक्य रहाणेने त्याला गोलंदाजीत बदल करण्याचा सल्ला दिला असून अक्षर पटेलचं उदाहरण दिलं आहे.

Published On: 

Ravindra Jadeja Bowling: Ajinkya Rahane advice to Jadeja after NZ Series

Ravindra Jadeja- क्रिकेटच्या मैदानात ‘सर जडेजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रविंद्र जडेजासाठी सध्याची वेळ थोडी कठीण आहे का? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे नुकतीच झालेली भारत विरुद्ध न्यूझीलंड वन-डे मालिका. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी, जडेजाने मात्र चाहत्यांची निराशा केली. आता याच मुद्द्यावरून भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने जडेजाला आरसा दाखवला आहे. झहीर खाननंतर आता रहाणेनेही रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Ajinkya Rahane advice to Ravindra Jadeja

न्यूझीलंडविरुद्धच्या तीनही वन-डे सामन्यांत जडेजाला एकही विकेट मिळाली नाही, ही आकडेवारी नक्कीच धक्कादायक आहे. यावर बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, “वन-डे क्रिकेटमध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन (विविधता) असायला हवी. जडेजा अनुभवी आहे, मान्य आहे… पण तो एकाच गतीने बॉलिंग करतोय. त्यामुळे तो predictable (अंदाज लावण्यायोग्य) होत चालला आहे.”

रहाणेने यावेळी जडेजाची तुलना अक्षर पटेलशी केली. “एकीकडे अक्षर पटेल वेगामध्ये बदल करतो, क्रीजचा वापर करून अँगल बदलतो. त्यामुळे बॅट्समनला संभ्रमात पाडणं सोपं जातं. पण जडेजा एकाच सरळ रेषेत मारा करतोय, जे सपाट खेळपट्टीवर बॅट्समनसाठी सोपं ठरतं,” असं स्पष्ट मत रहाणेने व्यक्त केलं.

आकडेवारीवर नजर टाकली तर, बडोदा (०/५६), आणि इंदूरच्या दोन सामन्यांत (०/४४ आणि ०/४१) जडेजाची पाटी कोरीच राहिली. किवी फलंदाजांनी त्याच्या फिरकीचा अगदी सहज सामना केला. २०२४ मध्येच टी-२० मधून निवृत्ती घेतलेल्या जडेजासाठी आता वन-डे फॉरमॅटमध्ये टिकून राहायचं असेल, तर त्याला आपल्या शैलीत बदल करावाच लागेल, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

सपाट खेळपट्ट्यांवर जर विकेट्स मिळत नसतील, तर जडेजाने ‘प्लॅन बी’ तयार ठेवायला हवा, असंही रहाणेने सुचवलं आहे. आता जडेजा या सल्ल्याचा विचार करून आपल्या गोलंदाजीत बदल करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही