Share

शिंदेंचे २५ नगरसेवक फुटणार? हॉटेलमधील ‘त्या’ भेटीच्या चर्चेने भाजपचं टेन्शन वाढलं!

मुंबईत महापौरपदावरून चुरस वाढली असून, संजय राऊतांनी शिंदेंच्या २५ नगरसेवकांबद्दल केलेल्या दाव्याने युतीत खळबळ उडाली आहे.

Published On: 

Eknath Shinde and Sanjay Raut | Mumbai Municipal Corporation election

🕒 1 min read

मुंबई– राजकारणात सध्या पडद्यामागे नेमकं काय शिजतंय, याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाहीये. आकड्यांच्या खेळात जरी महायुती पुढे असली, तरी महापौर कोणाचा होणार? यावरून आता जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. एकीकडे भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा जादुई आकडा ११४ आहे, त्यामुळे भाजपला सत्तेसाठी शिंदेंची गरज लागणारच आहे. पण याच संधीचा फायदा घेत संजय राऊत यांनी टाकलेल्या एका गुगलीमुळे Mumbai Municipal Corporation election च्या निकालानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे.

राऊतांचा मोठा दावा, शिंदेंची झोप उडाली?

संजय राऊत यांनी निकालानंतर जे वक्तव्य केलंय, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊत थेट म्हणाले, “शिंदेंचे जे उमेदवार निवडून आलेत, ते मूळचे शिवसैनिकच आहेत.” विशेष म्हणजे शिंदेंच्या २९ पैकी तब्बल २५ नगरसेवक हे मराठी आहेत, या मुद्द्यावर राऊतांनी बोट ठेवलं आहे. इतकंच नाही, तर “ज्या हॉटेलमध्ये शिंदेंचे नगरसेवक थांबलेत, तिथेच मी आज जेवायला जाणार आहे,” असं सूचक वक्तव्य राऊतांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. हे २५ नगरसेवक काही वेगळा निर्णय घेणार का? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

Mumbai Municipal Corporation election

भाजपचा महापौर खुद्द शिंदेंनाही नकोय?

दुसरीकडे, बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच (शिंदे गट) असावा, अशी एकनाथ शिंदे गटाची इच्छा असल्याचं बोललं जातंय. याबाबत संजय राऊत यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, “भाजपचा महापौर व्हावा, असे खुद्द एकनाथ शिंदे यांनाही वाटत नाही.” भाजपला जरी जास्त जागा मिळाल्या असल्या, तरी सत्तेची चावी शिंदेंकडे आहे आणि ते आपली ताकद वाढवण्यासाठी वाटाघाटी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या तरी भाजप आणि शिंदे गट यांच्यात महापौरपदावरून ‘तु तू मै मै’ सुरू झाल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरेंनीही “देवाच्या मनात असेल तर आमचाच महापौर होईल,” असं म्हणत सस्पेन्स कायम ठेवलाय. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या