Share

शतक ठोकलं तरी संघाबाहेर का? टीम इंडियाच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू भडकला; म्हणाला, ‘त्या’ खेळाडूची जागा…

ऋतुराज गायकवाडला न्यूझीलंड सिरीजमधून वगळल्याने माजी खेळाडूने संताप व्यक्त केला आहे. “नितीश रेड्डीच्या जागी ऋतुराज हवा होता,” असं सदागोपन रमेश यांनी म्हटलं आहे.

Published On: 

IND vs NZ 2026 Ruturaj Gaikwad

मुंबई – शतक ठोकूनही जर एखाद्या खेळाडूला संघाबाहेर बसावं लागत असेल, तर त्या खेळाडूने नेमकं करायचं तरी काय? सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांना हाच प्रश्न पडलाय. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी न मिळाल्याने अनेकजण नाराज आहेत. आता भारताचे माजी क्रिकेटपटू सदागोपन रमेश यांनीही याच मुद्द्यावरून निवड समितीला खडेबोल सुनावले आहेत. IND vs NZ 2026 मालिकेसाठी ऋतुराजला वगळल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

Ruturaj Gaikwad IND vs NZ 2026

गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऋतुराजने १०५ धावांची शानदार खेळी केली होती. तरीही श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल परतल्यामुळे त्याला डच्चू देण्यात आला. यावर रमेश यांनी इन्स्टाग्रामवर आपलं स्पष्ट मत मांडलं. ते म्हणतात, “नितीश कुमार रेड्डीच्या जागी ऋतुराज गायकवाड असायला हवा होता. रेड्डी खेळला, पण त्याचा उपयोग तरी काय झाला? त्याने फक्त दोन ओव्हर टाकल्या आणि शेवटी येऊन २० धावा केल्या.” वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यानंतर अचानक आयुष बदोनीला संघात घेण्याच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, भारताच्या फलंदाजीतील ‘पडझड’ (Collapse) कोणाच्याही लक्षात येत नाहीये, याकडेही रमेश यांनी लक्ष वेधलं. पहिल्या दोन वनडेमध्ये भारताची अवस्था बिकट झाली होती. पहिल्या सामन्यात २३४/२ वरून धावसंख्या २४२/५ वर घसरली, तर दुसऱ्या सामन्यात ९९/१ वरून ११८/४ अशी दैना उडाली. या दोन्ही वेळी के.एल. राहुल (KL Rahul) संकटमोचक ठरला, म्हणून भारताची इज्जत वाचली.

रमेश यांच्या मते, मधल्या फळीत होणारी ही पडझड पाहता, आयुष बदोनीसारख्या नवख्या खेळाडूला अचानक आणण्यापेक्षा ऋतुराजला संघात ठेवणं जास्त फायद्याचं ठरलं असतं. आता ही मालिका निर्णायक वळणावर आली आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रविवारी, १८ जानेवारीला होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात (Final ODI) भारताला आपल्या चुका सुधाराव्या लागतील, अन्यथा मालिका हातातून जाण्याची भीती आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही