Share

Babar Azam: स्मिथने सिंगल नाकारली अन् बाबरचा पारा चढला; पॅव्हेलियनमध्ये जाताना आदळली बॅट!

स्मिथने सिंगल नाकारल्यानंतर Babar Azam ने रागाच्या भरात बाउंड्रीवर बॅट आदळली. स्मिथच्या ३२ धावांच्या ओव्हरची आणि बाबरच्या रागाची जोरदार चर्चा.

Published On: 

Babar Azam Angry: स्मिथच्या निर्णयावर बाबर संतापला, बॅट आदळली

🕒 1 min read

क्रिकेटच्या मैदानात कधी काय ड्रामा होईल, हे सांगता येत नाही. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये (BBL) असंच काहीसं घडलं, ज्यामुळे धावांच्या पावसासोबतच खेळाडूंच्या रागाचीही चर्चा रंगली. सिडनी सिक्सर्सकडून खेळताना स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) ४२ चेंडूत १०० धावांची वादळी खेळी केली, पण याच मॅचमध्ये त्याचा पार्टनर Babar Azam मात्र प्रचंड संतापलेला दिसला. स्मिथने घेतलेल्या एका निर्णयामुळे बाबर इतका चिडला की, त्याने आउट झाल्यानंतर रागाच्या भरात चक्क सीमारेषेवर बॅट आदळली.

स्टीव्ह स्मिथने सिंगल नाकारली, Babar Azam ने रागात काय केलं?

झालं असं की, सिडनी सिक्सर्स १९० धावांचा पाठलाग करत होती. ११ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बाबरने एक रन घेण्याचा प्रयत्न केला, पण स्मिथने त्याला स्पष्ट नकार दिला. स्मिथला ‘पॉवर सर्ज’ (Power Surge) घ्यायचा होता आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. बाबरला हे फारसं रुचलं नाही, पण स्मिथचा हा निर्णय मॅच फिरवणारा ठरला. पॉवर सर्ज सुरू होताच स्मिथने रायन हॅडलीच्या ओव्हरमध्ये सलग ४ षटकार आणि एक चौकार मारत तब्बल ३२ धावा कुटल्या. बीबीएलच्या इतिहासातील ही सर्वात महागडी ओव्हर ठरली.

मात्र, स्मिथने धुलाई केल्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये नॅथन मॅकअँड्र्यूच्या पहिल्याच बॉलवर बाबर आझम बोल्ड झाला. एकीकडे स्मिथची फटकेबाजी आणि दुसरीकडे आपली विकेट गेल्याचे दु:ख, यामुळे बाबरचा संयम सुटला. मैदानाबाहेर जाताना त्याने रागाच्या भरात आपली बॅट जोरात बाउंड्री कुशनवर आदळली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सामन्यानंतर बोलताना स्मिथनेही कबूल केले की, बाबर नाराज होता. तो (Steve Smith) म्हणाला, “मी ती सिंगल नाकारली, त्यामुळे बाबर नक्कीच खूश नव्हता. पण मला पॉवर सर्जमध्ये शॉर्ट बाउंड्रीचा फायदा घ्यायचा होता आणि ३० धावा काढायच्या होत्या, आम्ही ३२ काढल्या.” स्मिथच्या या १०० धावांच्या खेळीमुळे सिडनी सिक्सर्सने ५ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला, पण चर्चा मात्र बाबरच्या रागाचीच जास्त झाली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या