Share

पुण्यात भयंकर राडा! रूपाली ठोंबरे पाटील थेट गेटवरच चढल्या; पोलिसांची तारांबळ, व्हिडिओ व्हायरल

ण्यात मतमोजणी केंद्रावर Rupali Thombare Patil यांचा हाय व्होल्टेज ड्रामा.

Published On: 

Rupali Thombare Patil यांचा रुद्रावतार, व्हिडिओने उडवली खळबळ

पुणे – पुण्यात निवडणुकीचा निकाल लागतोय की एखादा ॲक्शन सिनेमा सुरू आहे, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कसबा आणि पुणे शहरातील मतमोजणी केंद्रावर आज जे घडलं, ते पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आक्रमक नेत्या Rupali Thombare Patil यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये त्या चक्क मतमोजणी केंद्राच्या लोखंडी गेटवर चढताना दिसत आहेत. त्यांच्या या ‘स्टंट’मुळे काही काळ पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

नेमकं काय घडलं?

सकाळपासूनच पुण्यात ईव्हीएम (EVM) मशीनच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं होतं. रूपाली यांनी आरोप केला की, “आम्हाला दिलेल्या लिस्टमध्ये आणि मशीनवर असलेल्या नंबरमध्ये तफावत आहे.” अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून न घेतल्याने किंवा समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्या प्रचंड आक्रमक झाल्या. ‘जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही’, अशी भूमिका घेत त्यांनी थेट मतमोजणी केंद्राच्या गेटवरच थेट गेटवरच चढल्या.

व्हिडिओमध्ये काय दिसतंय?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रूपाली ठोंबरे अत्यंत संतापलेल्या अवस्थेत दिसत आहेत. आजूबाजूला कार्यकर्त्यांचा गराडा आहे आणि लेडीज पोलीस त्यांना गेटवरून खाली उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. “लोकशाहीचा मुडदा पाडू नका,” असा त्यांचा संताप त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसतोय. पुण्याच्या इतिहासात एका महिला नेत्याचा असा ‘रौद्रअवतार’ क्वचितच पाहायला मिळाला असेल.

या राड्यानंतर मतमोजणी केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार? आणि हा वाद कुठपर्यंत जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण तूर्तास, रूपाली ठोंबरेंच्या या ‘गेट क्लाइंबिंग’ व्हिडिओने पुण्याचं राजकारण चांगलंच तापवलंय.

Rupali Thombare Patil यांचा रुद्रावतार, व्हिडिओने उडवली खळबळ

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही