Share

Tejasvee Ghosalkar: ठाकरेंना ‘दे धक्का’! दहीसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा दणदणीत विजय, लीड पाहून विरोधक गार

दहीसरमध्ये भाजपच्या Tejasvee Ghosalkar यांनी १०,७५५ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला असून शिवसेनेच्या (ठाकरे गट) उमेदवाराचा दारूण पराभव झाला आहे.

Published On: 

Tejasvee Ghosalkar

🕒 1 min read

दहीसर– राजकारणात कधी काय होईल आणि वारा कोणत्या दिशेला फिरेल, हे भल्याभल्यांना सांगता येत नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, पण दहीसरमध्ये जे घडलंय, त्याने मातोश्रीला नक्कीच मोठा धक्का बसला असेल. पतीच्या निर्घृण हत्येनंतर राजकारणात सक्रिय झालेल्या Tejasvee Ghosalkar यांनी भाजपच्या तिकिटावर लढताना दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) उमेदवाराला ज्या फरकाने हरवलंय, तो आकडा पाहून राजकीय वर्तुळात ‘खळबळ उडाली’ आहे.

रेकॉर्डब्रेक मतांनी Tejasvee Ghosalkar विजयी

दहीसरच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये ही लढत होती. एकीकडे दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर, तर दुसरीकडे त्यांचीच मैत्रीण आणि ठाकरे गटाच्या उमेदवार धनश्री कोलेगे. त्यामुळे ही लढत चुरशीची होईल असा अंदाज होता. पण निकाल समोर आला आणि चित्र पूर्णपणे एकतर्फी दिसलं. तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीअखेरच त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.

आकड्यांवर नजर टाकली तर हा विजय किती मोठा आहे, याचा अंदाज येतो. तेजस्वी घोसाळकर यांना तब्बल १६,४८४ मते मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या शिवसेनेच्या धनश्री कोलेगे यांना अवघ्या ५,७२९ मतांवर समाधान मानावं लागलं. म्हणजेच, तेजस्वी यांनी १०,७५५ मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला आहे. हा विजय भाजपसाठी आणि विशेषतः प्रवीण दरेकर यांच्यासाठी मोठा मानला जातोय.

अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या ‘फेसबुक लाईव्ह’ हत्येप्रकरणानंतर घोसाळकर कुटुंबाकडे सहानुभूती होतीच. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वी यांनी ‘कमळ’ हातात घेतलं. आजचा निकाल पाहता, मतदारांनी तेजस्वी यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येत आहे. या विजयामुळे दहीसरमध्ये भाजपची ताकद वाढली असून, ठाकरे गटाला आत्मचिंतन करावं लागणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या