‘ती शाई बटाटा घासूनही जायची नाही…’, सचिन गोस्वामींची खोचक पोस्ट तुफान व्हायरल!

मतदानाची शाई पुसली जात असल्याच्या तक्रारींवरून रान पेटले असतानाच सचिन गोस्वामींची ‘फाउंटन पेन’वाली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published On: 

Sachin Goswami Post: शाळेतली शाई आठवतेय? गोस्वामींचा मतदानाच्या शाईवर खोचक टोला!

मुंबई – शाळेत असताना हाताला किंवा कपड्याला लागलेली शाई आठवतेय? कितीही घासली तरी ती निघायचं नाव घ्यायची नाही. पण कालच्या निवडणुकीत वापरलेली शाई मात्र हात धुण्याआधीच गायब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मतदानाच्या या ‘मॅजिक शाई’वरून सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे. यातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दिग्दर्शक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) यांनी एक अशी पोस्ट केली आहे, जी वाचून तुम्हाला हसूही येईल आणि विचारही करायला लावेल.

राज्यात १५ जानेवारीला २९ महापालिकांसाठी मतदान पार पडलं, पण चर्चा निकालाची नाही तर Voting Ink ची जास्त रंगली आहे. अनेक ठिकाणी बोटावर लावलेली शाई सॅनिटायझर किंवा साध्या नेल पेंट रिमूव्हरने काही सेकंदात पुसली जात असल्याचं समोर आलं. या प्रकारामुळे बोगस मतदानाची भीती व्यक्त केली जात असतानाच, सचिन गोस्वामी यांनी या गंभीर मुद्द्यावर त्यांच्या खास शैलीत भाष्य केलं आहे.

Sachin Goswami Post

गोस्वामी यांनी फेसबुकवर एक मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी थेट निवडणुकीचा किंवा निवडणूक आयोगाचा उल्लेख टाळला आहे, पण त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे हे नेटकऱ्यांना बरोबर समजलंय. ते म्हणतात, “शाळेत फाउंटन पेनची शाई कोणी शर्टावर शिंपडली की बटाटा घासून पण जायची नाही… चिवट होती ती.”

त्यांच्या या एका वाक्याने सोशल मीडियावर म्हणून धुमाकूळ घातला आहे. सध्याच्या निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या शाईच्या दर्जावर यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे पण अतिशय खोचक शब्दांत बोट ठेवलं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट्सचा पूर आला आहे. एका युजरने लिहिलंय की, ‘आत्ताच्या शाईवर फक्त डिओ स्प्रे मारला तरी ती गायब होतेय.’ तर काहींनी फोटो शेअर करत शाई कशी गायब झाली हे पुराव्यानिशी दाखवलं आहे.

मनसे नेते आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनीही एक व्हिडिओ शेअर करत शाई अवघ्या १० सेकंदात निघत असल्याचा दावा केला आहे. अभिजीत पानसे (Abhijeet Panse) यांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत मतदानात फेरफार होण्याची शक्यताही बोलून दाखवली आहे. त्यामुळे एकीकडे प्रशासनाचा दावा आणि दुसरीकडे सोशल मीडियावरचे हे व्हिडिओ, यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही