Share

‘इंटरनॅशनल’ स्कूलबाहेर कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकरचा तिळपापड; म्हणाला, ‘उद्या कोणीही निवडून येऊ दे…’

ठाण्यातील इंटरनॅशनल स्कूलबाहेर कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकर भडकला. “उद्या कोणीही निवडून आलं तरी हे बदलणार नाही,” म्हणत त्याने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Published On: 

Shashank Ketkar Video: इंटरनॅशनल स्कूलबाहेर कचऱ्याचा ढीग, अभिनेत्याचा संताप

ठाणे – आपण विकासाच्या गप्पा मारतो, स्मार्ट सिटीची स्वप्नं बघतो, पण वास्तवात आपल्या शहरांची अवस्था काय आहे? याचा एक धक्कादायक आणि संतापजनक अनुभव आज खुद्द मतदानाच्या दिवशीच समोर आला आहे. ठाण्यात घडलेल्या या प्रकाराने अभिनेता शशांक केतकरचं (Shashank Ketkar) चांगलंच डोकं सटकलंय. नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर रोखठोक बोलणाऱ्या शशांकने मतदानानंतर एक Video शेअर करत प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी आज सकाळपासूनच मतदान प्रक्रिया सुरू आहे. शशांक केतकर मतदानासाठी ठाण्यातील एका नामांकित ‘इंटरनॅशनल स्कूल’मध्ये गेला होता. शाळा ‘इंटरनॅशनल’ असली तरी बाहेरचं दृश्य मात्र भयानक होतं. शाळेच्या गेटवरच कचऱ्याचा मोठा ढीग साचलेला पाहून शशांकचा राग अनावर झाला. त्याने तिथेच मोबाईल काढला आणि ती घाणेरडी अवस्था रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केली.

Actor Shashank Ketkar Shares Ground Reality

या व्हिडिओमध्ये Actor Shashank Ketkar Shares Ground Reality असं म्हणत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तो म्हणतो, “ज्या शाळेत मी मतदान केलं, त्या शाळेसमोरील हे दृश्य बघा. उद्या कोणत्याही पार्टीचा, कोणताही उमेदवार निवडून आला तरी ‘स्वच्छता’ या सामान्य गोष्टीसाठी कोणी पुढाकार घेईल असं वाटत नाही. आणि दुर्दैवाने, नागरिक म्हणून आपणही याकडे लक्ष देणार नाही, याची खात्री आहे.”

“ही माझी उदासीनता नाही, तर ही वस्तुस्थिती (Fact) आहे. ठाण्यातील एका इंटरनॅशनल स्कूलसमोरील ही अवस्था अजिबात चालणार नाही,” अशा शब्दांत त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सुसाट व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही शशांकच्या मताशी सहमती दर्शवली आहे. एकीकडे मंदार देवस्थळी प्रकरणामुळे चर्चेत असलेला शशांक, आता या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही