Share

Team India: तिलक वर्मापाठोपाठ आता ‘हा’ स्टार खेळाडू टी-20 मालिकेतून बाहेर, वर्ल्ड कप खेळण्यावरही प्रश्नचिन्ह!

तिलक वर्मापाठोपाठ आता Washington Sundar न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला असून, त्याच्या वर्ल्ड कप खेळण्यावरही अनिश्चिततेचे सावट आहे.

Published On: 

Washington Sundar

Team India: विश्वचषक तोंडावर आला असताना टीम इंडियाची डोकेदुखी काही कमी होताना दिसत नाहीये. एकीकडे तिलक वर्मा दुखापतग्रस्त असल्याची चर्चा असतानाच, आता आणखी एका ‘मॅच विनर’ खेळाडूच्या दुखापतीने भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढवलं आहे. भारताचा स्टार ऑलराऊंडर Washington Sundar आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतूनही बाहेर पडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तो आगामी टी-20 वर्ल्ड कपलाही (T20 World Cup) मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकं काय घडलं?

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये (IND vs NZ) वॉशिंग्टन सुंदरला ‘साईड स्ट्रेन’चा त्रास जाणवला होता. त्याने ५ ओव्हर गोलंदाजी केली, पण वेदना असह्य झाल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. असं असलं तरी, संघासाठी तो फलंदाजीला आला होता. मात्र, ही रिस्क त्याला चांगलीच महागात पडली आहे. बीसीसीआयने त्याला आधीच वनडे मालिकेतून वगळले होते आणि त्याच्या जागी आयुष बदोनीला संधी दिली होती. आता तो टी-20 मालिकेतूनही अधिकृतपणे बाहेर झाला आहे.

दुखापतीमुळे Washington Sundar टी-20 मालिकेतून ‘आऊट’, वर्ल्ड कपचं काय?

आता चर्चा अशी आहे की, वॉशिंग्टन सुंदरची दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. क्रिकबझने (Cricbuzz) दिलेल्या रिपोर्टनुसार, सुंदरला सावरण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे तो आगामी T20 World Cup मध्ये खेळू शकेल की नाही, याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. वर्ल्ड कपच्या आधी तो पूर्णपणे फिट होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे, बीसीसीआयने (BCCI Update) यावर तातडीने पावले उचलली आहेत. स्कॅनिंगनंतर सुंदरला बेंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये (NCA) दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. मात्र, त्याआधीच वॉशिंग्टन सुंदरसारखा महत्त्वाचा खेळाडू बाहेर गेल्याने टीम इंडियाचं संतुलन बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.

T20 World Cup 2026 पूर्वी ही मालिका महत्त्वाची आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी न्यूझीलंड विरुद्धच्या संघात कोणाला स्थान मिळणार हे पाहावं लागेल.

भारत आणि न्यूझीलंड टी 20 सामन्यांचं वेळापत्रक

21 जानेवारी- वीसीए स्टेडियम, नागपूर
23 जानेवारी- एसवीएनएस स्टेडियम, रायपूर
25 जानेवारी- बरसापारा स्टेडियम, गुवाहाटी
28 जानेवारी- एसीए-वीडीसीए, विशाखापट्टनम
31 जानेवारी- ग्रीनफील्ड स्टेडियम, तिरुअनंतपुरम

IND vs NZ यांच्यातील T20i सामने सायंकाळी 7 वाजता सुरु होतील. 

भारताचा IND vs NZ संघ

सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकॅप्टन), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंगटन सुंदर , ईशान किशन (विकेटकीपर).

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही