Share

तमिमला ‘भारताचा एजंट’ म्हणणं भोवलं; खेळाडूंच्या एकजुटीपुढं बांगलादेश बोर्ड झुकलं, संचालकाची हकालपट्टी!

तमिम इक्बालला भारताचा एजंट म्हटल्याने भडकलेल्या खेळाडूंनी BPL सामन्यावर बहिष्कार टाकला. अखेर दबावामुळे बोर्डाने संचालक नजमूल इस्लाम यांची हकालपट्टी केली आहे.

Published On: 

Tamim Iqbal Row | Bangladesh Cricket Board

मुंबई – मैदानात अंपायर्स आणि मॅच रेफरी उभे आहेत, प्रेक्षक वाट बघतायत, पण टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन यायलाच तयार नाहीत… हे दृश्य एखाद्या गल्ली क्रिकेटमधलं नाही, तर बांगलादेश प्रीमिअर लीग (BPL) च्या पहिल्याच मॅचमधलं आहे. खेळाडू आणि बोर्डातला वाद शिगेला पोहोचल्याचं हे जिवंत उदाहरण होतं. अखेर खेळाडूंच्या या आक्रमक पवित्र्यापुढं बांगलादेश बोर्डाला (Bangladesh Cricket Board) नमतं घ्यावं लागलंय.

बांगलादेशचा माजी कॅप्टन तमिम इक्बाल (Tamim Iqbal) याने भारतासोबतचा वाद चर्चेतून सोडवावा, असा सल्ला दिला होता. पण हा सल्ला बीसीबीचे संचालक नजमूल इस्लाम यांच्या पचनी पडला नाही. त्यांनी तमिमला थेट ‘भारताचा एजंट’ म्हणून हिणवलं. या विधानामुळे बांगलादेशच्या क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आपल्याच माजी कॅप्टनचा हा अपमान खेळाडूंच्या जिव्हारी लागला.

Bangladesh Cricket Board

त्यामुळेच खेळाडूंची संघटना ‘क्रिकेटर्स वेलफेअर असोसिएशन’ने आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत नजमूल इस्लाम यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. याचा फटका BPL च्या पहिल्याच मॅचला बसला. काल नौखाली एक्सप्रेस आणि चट्टोग्राम रॉयल्स यांच्यात सामना होणार होता, पण खेळाडूंनी बहिष्कार टाकल्याने टॉस सुद्धा होऊ शकला नाही.

खेळाडूंचा हा रुद्रावतार पाहून बीसीबीला तातडीने हालचाली कराव्या लागल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाचे अध्यक्ष फारुक अहमद यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून नजमूल इस्लाम यांची फायनान्स कमिटीच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी केली आहे. बीसीबीच्या संविधानातील ‘कलम ३१’ अन्वये ही कारवाई करण्यात आली असून, आता हा कार्यभार स्वतः अध्यक्षांकडे असणार आहे.

बोर्डाने काढलेल्या पत्रकात स्पष्ट म्हटलंय की, “खेळाडूंचा सन्मान ही आमची प्राथमिकता आहे.” आता नजमूल यांना पदावरून हटवल्यानंतर खेळाडू पुन्हा मैदानात उतरणार का आणि लीग सुरळीत होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही