Share

राज ठाकरेंना धक्का; ‘दादर’चा वाघ भाजपच्या गळाला! नितेश राणेंनी ‘असा’ फिरवला गेम

Major setback for MNS as senior leader Santosh Dhuri joins BJP, citing lack of respect within the party; Nitesh Rane played a key role.

Published On: 

Major setback for MNS as senior leader Santosh Dhuri joins BJP, citing lack of respect within the party; Nitesh Rane played a key role.

🕒 1 min read

मुंबई – राजकारणात निष्ठा किती काळ टिकते, याचं उत्तर शोधणं कठीण झालंय. राज ठाकरेंच्या सावलीसारखे वावरणारे आणि दादरमध्ये मनसेचा चेहरा मानले जाणारे संतोष धुरी (Santosh Dhuri) आता अधिकृतपणे भाजपच्या ताफ्यात दाखल होत आहेत. कालपर्यंत ज्यांच्या खांद्यावर मनसेचा झेंडा होता, त्यांनी आज अचानक ‘कमळ’ हातात घेण्याचा निर्णय घेतल्याने मनसेच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

MNS Santosh Dhuri Joins BJP

नितेश राणेंनी लावला ‘फिल्डिंग’

मनसेच्या या खंद्या शिलेदाराला भाजपच्या गळाला लावण्यात मोठी भूमिका बजावली ती कोकणातील फायरब्रँड नेते नितेश राणे यांनी. नितेश राणे खास सिंधुदुर्गावरून मुंबईत आले आणि त्यांनी धुरींना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला नेले. या भेटीचा फोटो व्हायरल झाल्यानंतरच धुरींच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. नितेश राणे हे कोकणातील नेते असूनही मुंबईच्या राजकारणात त्यांनी (Santosh Dhuri) मनसेला हा दिलेला मोठा धक्का मानला जातोय.

धुरींनी पक्ष सोडण्याचं कारण काय सांगितलंय माहितीये? त्यांनी एका वाक्यात मनातली सगळी खदखद बोलून दाखवली “मनसेत माझी कदर करण्यात आली नाही.” मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) रणधुमाळीत वॉर्ड क्रमांक १९४ ची जागा शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) सुटल्याने धुरींचं तिकीट कापलं गेलं. हीच गोष्ट धुरींच्या जिव्हारी लागली. “मी तिकिटासाठी नाराज नाही, पण सन्मान मिळाला नाही,” असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. आज सकाळी संदीप देशपांडे त्यांना भेटले, पण तिथेही राजकीय चर्चा झाली नाही. “त्यांनी मैत्री ठेवली तर आमची मैत्री राहील,” असं सांगत धुरींनी जुन्या सोबत्यांनाही सूचक मेसेज दिलाय. विशेष म्हणजे, पक्ष सोडण्याचा निर्णय घेताना मनसेच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने संपर्क साधला नसल्याचा दावाही धुरींनी केलाय. दादरच्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडल्याने राज ठाकरे आता काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही