पुणे – राजकारणात मित्र कोण आणि शत्रू कोण, हे सत्तेच्या समीकरणावरून ठरत असतं, पण पुण्यात सध्या वेगळंच रामायण घडतंय. राज्यात सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुण्याच्या मैदानात मात्र एकमेकांचे कपडे फाडताना दिसत आहेत. ‘दादा विरुद्ध दादा’ अशा रंगलेल्या या सामन्यात आता चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) अजित पवारांच्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं आहे.
BJP Minister Chandrakant Patil warns Ajit Pawar
“अजितदादा, जनता खुळी नाही…”
“पाच वर्षांत भाजपनं काय केलं?” असा प्रश्न विचारणाऱ्या अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांनी चांगलाच समाचार घेतला. “अजितदादा, जनता काय खुळी नाहीये,” असा सणसणीत टोला लगावत पाटलांनी थेट २००१ ते २०१७ या काळातील हिशोबच जनतेसमोर मांडला. “तुम्ही सत्तेत असताना मेट्रो का केली नाही? तुमच्या काळात मेट्रो फक्त कागदावर होती, ती आम्ही प्रत्यक्षात रुळावर आणली,” असा हल्लाबोल पाटलांनी केला. इतकंच नाही तर, “आम्हाला हलक्यात घेऊ नका, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमचाच आहे,” असा गर्भित इशारा द्यायलाही ते (Chandrakant Patil) विसरले नाहीत.
पुण्यासाठी ‘पाताळात’ जाण्याची तयारी!
एकीकडे राजकीय टोलेबाजी सुरू असताना, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या विकासाचा ‘मेगा प्लॅन’ मांडला. पुण्याच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आता जमिनीवरून नाही, तर चक्क जमिनीखालून रस्ते करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. “पुण्यात ५४ किलोमीटरचे बोगदे (Tunnels) खणणार असून, त्याची सुरुवात कात्रजपासून होईल,” अशी मोठी घोषणा फडणवीसांनी केली.
४४ हजार कोटींचा ‘कॅपिटल प्लॅन’
पुणे हे देशातील पहिलं ‘व्हायब्रंट शहर’ बनवण्यासाठी ४४ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यात २४ तास पाणीपुरवठा, १३ नवीन उड्डाणपूल आणि एआय (AI) आधारित वाहतूक नियंत्रण यांचा समावेश असेल. “मी हवेत गप्पा मारत नाही, माझ्याकडे पक्का प्लॅन तयार आहे,” असा विश्वास फडणवीसांनी पुणेकरांना दिला. आता १५ तारखेला पुणेकर कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांना इशारा: “आरसा बघायची गरज कोणाला? जास्त मागे जाल तर वाद वाढेल!”
- “पोलीस बाजूला करा, मग बघा…”; संजय राऊतांची जीभ घसरली? शिंदेंना थेट ‘ठोकून काढण्या’चा इशारा!
- मुंबईकरांनो, आज-उद्या हाल होणार! पश्चिम रेल्वेच्या 215 लोकल फेऱ्या रद्द; नेमकं कारण काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












