Share

देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांना इशारा: “आरसा बघायची गरज कोणाला? जास्त मागे जाल तर वाद वाढेल!”

CM Devendra Fadnavis warns Ajit Pawar during Pune rally, advising him not to dig up the past.

Published On: 

DCM Ajit Pawar slams BJP over massive corruption in PCMC, alleging funds misuse in everything from road tenders to dog sterilization. | Devendra Fadnavis

पुणे – राजकारणात युती असली तरी निवडणुकीच्या मैदानात मात्र ‘मैत्री’ बाजूला राहते आणि जुने हिशोब बाहेर येतात, याचा प्रत्यय सध्या पुण्यात येतोय. पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारावरून अजित पवारांनी भाजपवर तोफ डागली, आणि आता त्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या खास ‘संयमी पण मार्मिक’ शैलीत उत्तर दिलंय. पुण्यातल्या कात्रज चौकात झालेल्या सभेत फडणवीसांनी एका वाक्यात अजितदादांना ‘मेसेज’ पोहोचवला आहे.

Devendra Fadnavis warns Ajit Pawar

“कामं विचारणाऱ्यांनी आधी आरशात बघावं”

सोमवारी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अजित पवारांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना ते म्हणाले, “आम्ही काय कामं केली हे विचारणाऱ्यांनी आधी एकदा आरसा पाहावा.” पुण्यातली निवडणूक रंगात आली आहे, हे खरंय. पण त्याचवेळी, “ते दादा (अजित पवार) बोलतायत आणि आमचे दादा (चंद्रकांत पाटील) त्यांना उत्तर देतायत,” अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. फडणवीस म्हणाले, “आपण जेवढं मागे जाऊ, तेवढा हा वाद वाढेल.” त्यामुळे जुनी प्रकरणं उकरून काढू नका, अन्यथा आम्हालाही बोलावे लागेल, असा थेट इशाराच फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिला आहे.

पुण्याचा विकास कुणामुळे?

पुणे हे राज्याचं सांस्कृतिक आणि शैक्षणिक हब आहे. “गेल्या पाच वर्षांत भाजपने पुण्याचा चेहरामोहरा बदलला,” असा दावा फडणवीसांनी केला. विरोधकांनी नुसती टीका करण्यापेक्षा वस्तुस्थिती तपासावी, असं आव्हानही त्यांनी दिलं.

चंद्रकांत पाटलांचा ‘दम’

“आम्हाला हलक्यात घेऊ नका!” एकीकडे फडणवीसांनी सूचक इशारा दिला, तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी थेट हल्लाबोल केला. “अजितदादा, जनता खुळी नाहीये,” असं म्हणत त्यांनी मेट्रोच्या विलंबावरून पवारांना कोंडीत पकडलं. “तुमच्या काळात मेट्रो फक्त कागदावर होती, ती आम्ही प्रत्यक्षात आणली. २००१ ते २०१७ पर्यंत तुम्हाला का जमलं नाही?” असा सवाल पाटलांनी विचारला. इतकंच नाही तर, “दमानं घ्या, आम्हाला हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद (Devendra Fadnavis) आमच्याकडे आहे हे विसरू नका,” असा सज्जड दमही चंद्रकांत पाटलांनी भरला.

पुण्यातलं वातावरण आता चांगलंच तापलं असून, ‘दादा विरुद्ध दादा’ हा कलगीतुरा आगामी काळात आणखी रंगणार, हे नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही