Share

“मोदींनी कैलास बांधला अन् शिंदेंनी समुद्र…”, “डोममध्ये जमले होते ‘डोमकावळे’…”; उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी

Uddhav Thackeray mocks PM Modi and CM Shinde with sarcasm, calling rebel leaders “Domkavle”.

Published On: 

Uddhav Thackeray , Devendra Fadnavis. eknath shinde

🕒 1 min read

मुंबई – राजकीय भाषणात उपमा आणि अलंकारांची पेरणी करण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा हातखंड आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. वरळीच्या एनएससीआय डोममध्ये (NSCI Dome) झालेल्या मेळाव्याचा धागा पकडत ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपवर शेलक्या शब्दांत प्रहार केला. “त्या डोममध्ये अनेक ‘डोमकावळे’ जमा झाले होते,” असा सणसणीत टोला लगावत त्यांनी बंडखोरांचा समाचार घेतला.

मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच असावा, असा आग्रह धरणाऱ्यांनीच गद्दारी केल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. “जे गद्दार आज आमच्यातून गेले आहेत, त्यांना सोबत घेताना भाजप मराठी माणसाला हिंदू मानत नाही का?” असा रोकठोक सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘मराठी कार्ड’ आणि ‘हिंदुत्व’ यावरून घमासान होणार, हे स्पष्ट झालंय.

सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांच्या जाहिरातबाजीवर टीका करताना ठाकरेंनी उपरोधाचे (Sarcasm) ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. ते म्हणाले, “आता हे लोक असे दावे करतील की, मोदींनी स्वतः कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली आणि एकनाथ शिंदेंनी अरबी समुद्र निर्माण केला… असंच आता म्हणावं लागेल!” त्यांच्या(Uddhav Thackeray) या वाक्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

नार्वेकर vs ठाकरे संघर्ष पेटणार? इतकेच नाही तर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. नार्वेकर स्वतःला चित्रपटातील ‘नायक’ समजतात, अशी टीका करत त्यांनी निलंबनाची मागणी केली. ठाकरेंचा (Uddhav Thackeray) हा आक्रमक अवतार पाहता, आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत ‘वचननाम्या’पेक्षा ‘आरोप-प्रत्यारोपां’चाच कलगीतुरा जास्त रंगणार, अशी चिन्हे आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही