Share

६,६,६,६,६,६…; चौकारांशी ‘ब्रेकअप’, फक्त षटकारांशी व्यवहार! वैभव सूर्यवंशीच्या वादळाने चेंडूच हरवला

India U19 star Vaibhav Suryavanshi smashes 68 runs off 24 balls against South Africa, hitting 10 sixes and reaching his fifty without a single four.

Published On: 

India U19 star Vaibhav Suryavanshi smashes 68 runs off 24 balls against South Africa, hitting 10 sixes and reaching his fifty without a single four.

🕒 1 min read

मुंबई – क्रिकेटच्या मैदानात वादळ येतं तेव्हा काय होतं, याचा थरारक अनुभव दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी नुकताच घेतला. भारताचा ‘छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) दुसऱ्या युथ वनडे सामन्यात गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. अवघ्या २४ चेंडूत ६८ धावांची अशी काही आतषबाजी केली की, समोरच्या संघाला पळता भुई थोडी झाली!

Vaibhav Suryavanshi smashes 68 runs off 24 balls

वैभव मैदानात उतरला तोच मुळी ‘मार’ द्यायच्या इराद्यानेच! गोलंदाज बॅसनच्या पहिल्याच चेंडूवर त्याने डीप बॅकवर्ड पॉईंटवर गगनभेदी षटकार ठोकला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. २१ चेंडूत तब्बल १० षटकार ठोकणाऱ्या वैभवचा तोरा पाहून गोलंदाजही कापले.

चौकार एकही नाही, फक्त षटकार!

साधारणपणे फलंदाज एकेरी-दुहेरी धावा किंवा चौकार मारून सेट होतात. पण वैभवने वेगळाच इतिहास रचला. त्याने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि विशेष म्हणजे या ५० धावांत एकही चौकार नव्हता! त्याने (Vaibhav Suryavanshi) फक्त आणि फक्त षटकार मारूनच अर्धशतक गाठलं. बायंडा माजोला असो वा बॅसन, त्याने कुणालाच सोडलं नाही.

खेळ थांबला, कारण चेंडूच सापडेना!

वैभवच्या बॅटिंगची ताकद एवढी होती की, त्याने मारलेला सातवा षटकार थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. बराच वेळ शोधूनही चेंडू सापडला नाही, त्यामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला. अखेर चेंडू बदलावा लागला, पण वैभवचा ‘मार’ काही थांबला नाही. अखेर क्रुस्कॅम्पच्या गोलंदाजीवर तो बाद झाला, पण तोवर त्याने २८३.३३ च्या स्ट्राईक रेटने ६८ धावा कुटून आपलं काम चोख बजावलं होतं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या