🕒 1 min read
पनवेल ( Panvel )– राजकारणात नेत्यांची भाषणं आपण नेहमीच ऐकतो, पण जेव्हा सर्वसामान्य माणूस पेटून उठतो, तेव्हा काय होतं याचा प्रत्यय सध्या सोशल मीडियावर येत आहे. पनवेलमधील एका सामान्य मतदाराचा व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, त्यात त्यांनी भाजपवर (BJP) अक्षरशः तोफ डागली आहे. “पूर्वी इंग्रज होते, आता भाजपवाले इंग्रज झालेत. त्यांना इलेक्शन घ्यायचेच नाहीत,” अशा शब्दांत या काकांनी भररस्त्यात आपली चीड व्यक्त केली आहे.
“तुम्हीच बसा ५० वर्ष…” पनवेलमध्ये पत्रकारांशी बोलताना या सामान्य नागरिकाचा संताप अनावर झाला होता. ते म्हणाले, “तुम्ही इलेक्शन घेऊच नका, अख्ख्या देशावर तुम्हीच बसा. २० काय ५० वर्षे तुम्हीच राज्य करा. याला काय लोकशाही म्हणतात का? पैसे देऊन तुम्ही उमेदवार विकत घेता, मग लोकांना मतदानाचा अधिकार कुठे उरला?” भाजपने लोकशाहीचा बाजार मांडल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. महानगरपालिकेत ‘बिनविरोध’ निवडीच्या प्रकारावरही त्यांनी सडकून टीका केली. “ग्रामपंचायतीत बिनविरोध ठीक आहे, पण महानगरपालिकेत बिनविरोध कधी बघितलंय का? हे इंग्रजी नीती वापरत आहेत,” असं ते पोटतिडकीने म्हणाले.
विकासाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला आरसा दाखवला. “विकास म्हणजे काय? शेती बुडवायच्या आणि तिथे बिल्डिंगी बांधायच्या? उद्या खायला अन्नच नसेल, तर काय माती खाणार का?” असा रोकठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपवर टीका करतानाच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कामाचं कौतुक केलं. “मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंनी विकास केला होता. त्यांनी ९५ हजार कोटींच्या एफडी (FD) जमवल्या होत्या, पण फडणवीसांच्या सरकारने त्या मोडल्या,” असा आरोप त्यांनी केला. मोदी एवढे मोठे नेते असतानाही ८-८ वर्षे महापालिका निवडणुका का रखडल्या? हे सर्व सोयीप्रमाणे चाललंय, असं म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कडाडून प्रहार केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली…”; पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय! आता ‘या’ मतदारसंघावर लक्ष
- स्वतःचीच नक्कल पाहून आमिर खान संतापला की हसला? सुनील ग्रोव्हरबद्दल ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ने दिलं थेट उत्तर!
- संभाजीनगरमध्ये भाजपचा ‘गेम’; २२ बंडखोरांची थेट हकालपट्टी! ११ जण शिंदेंच्या गळाला, तर ‘जुने’ पुन्हा रिंगणात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











