Share

प्रचाराचा ‘धूर’ निघाला! फटाक्यांमुळे इमारतीला आग; संतापलेली अभिनेत्री म्हणाली, “हे मूर्ख लोक…”

Actress Daisy Shah lashes out at political workers after firecrackers caused a fire in a neighboring building during BMC election campaigning in Mumbai.

Published On: 

Actress Daisy Shah lashes out at political workers after firecrackers caused a fire in a neighboring building during BMC Election 2026 campaigning in Mumbai.

मुंबई : निवडणुकीचा उत्साह सध्या शिगेला पोहोचलाय, पण हा अतिउत्साह कसा नडतो आणि जीवावर बेततो, याचा एक भयंकर प्रकार मुंबईत घडलाय. मतांचा जोगवा मागण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या बेजबाबदारपणामुळे चक्क एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह (Daisy Shah) हिचा पारा चढला असून, तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत राजकीय कार्यकर्त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे.

सध्या राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकांची (BMC Election 2026) रणधुमाळी सुरू आहे. घरोघरी प्रचार सुरू असताना डेझी शाहच्या इमारतीच्या शेजारी एका राजकीय पक्षाची प्रचार रॅली आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात रस्त्यावरच फटाके फोडले आणि त्याची ठिणगी उडून शेजारच्या इमारतीला भीषण आग लागली. आपल्या डोळ्यासमोर हा अनर्थ घडताना पाहून डेझी शाहच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

BMC Election 2026

“हे लोक इथे प्रचारासाठी आले होते, पण त्यांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे इमारतीला आग लागली. हे निव्वळ मूर्खपणाचे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही प्रचारासाठी टीम नेमता, तेव्हा त्यांना थोडी अक्कल (Common Sense) आहे का, हे आधी तपासा.” विशेष म्हणजे, ही काही नैसर्गिक आपत्ती नसून “मूर्ख लोकांमुळे ओढवलेले संकट” असल्याचे तिने स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.

या व्हिडिओमध्ये डेझीने तिच्या सोसायटीच्या कमिटीचे आभार मानले आहेत, कारण त्यांनी या कार्यकर्त्यांना इमारतीत प्रचारासाठी बंदी घातली होती. “जे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे… नागरिकांमध्ये सिव्हिक सेन्स नसणे हे धोकादायक आहे,” अशा शब्दांत तिने राजकीय पक्षांना आरसा दाखवला आहे.

निवडणुका येतात आणि जातात, पण मतांसाठी सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे? हा प्रश्न आता उपस्थित होतोय.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही