Share

मतमोजणी केंद्रावर पोलीस आणि कार्यकर्त्यांत तुफान राडा! सेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, हर्षदा शिरसाट आक्रमक

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा लाठीचार्ज, शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण. हर्षदा शिरसाट यांनी मतमोजणी रोखली.

Published On: 

Sanjay Shirsat removed from cidco chairman post

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर- निवडणुकीचा निकाल आज लागणार म्हणून कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती, पण निकालाआधीच छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घडलं त्याने एकच खळबळ उडाली आहे. मतमोजणीच्या आनंदावर विरजण पडलं असून, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मतमोजणी केंद्राचं रुपांतर आखाड्यात झाल्याचं पाहायला मिळालं. उमेदवाराच्या प्रतिनिधीला आत सोडण्यावरून सुरू झालेला वाद थेट लाठीचार्जपर्यंत गेला आणि यात शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली.

नेमकं काय घडलं?

सकाळी मतमोजणीला सुरुवात होत असतानाच, उमेदवारांच्या प्रतिनिधींना आत प्रवेश देण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, पोलिसांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट लाठी उगारली. यात शिवसेनेचे कार्यकर्ते विकास जैन यांना पोलिसांनी मारहाण केली. मारहाण इतकी जबर होती की, जैन यांच्या पाठीवर लाठीचे वळ स्पष्ट दिसत आहेत. या घटनेमुळे Chhatrapati Sambhajinagar मधील वातावरण चांगलंच तापलं आहे.

Chhatrapati Sambhajinagar Vote Counting 

घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या Harshada Shirsat यांनी तडक मतमोजणी केंद्र गाठले. आपल्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे पाहून त्या प्रचंड आक्रमक झाल्या. त्यांनी पोलिसांना धारेवर धरत इशारा दिला की, “ज्या पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मतमोजणीला सुरुवात होऊ देणार नाही.” जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कुणालाही आत जाऊ देणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

दुसरीकडे, गरवारे मतदान केंद्रावरही गोंधळाची परिस्थिती आहे. प्रचंड गर्दी झाल्याने आणि आत बसायला जागा नसल्याने चक्क उमेदवारांनाच बाहेर काढण्यात आले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रशासन आणि पोलीस गर्दी आवरण्याचा प्रयत्न करत असले, तरी शहरात सध्या या ‘राड्या’चीच चर्चा रंगली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!