आमदारपुत्राचा ११ हजार मतांनी विजय, पण ‘ती’ तुरुंगातून जिंकली! सोलापुरात भाजपचा ‘धक्का’

सोलापुरात भाजप आमदार पुत्राने ११ हजार मतांनी निवडणूक जिंकली, तर हत्येच्या आरोपात तुरुंगात असलेल्या शालन शिंदे याही ४ हजार मतांनी विजयी झाल्याने खळबळ.

Published On: 

Shalan Shinde Solapur Municipal Corporation

सोलापुर– तुरुंगातून निवडणूक जिंकता येते का? असा प्रश्न विचारला तर सोलापूरच्या जनतेने आज ‘हो’ असं धक्कादायक उत्तर दिलंय. निवडणुकीच्या रिंगणात काय होईल याचा अंदाज राजकीय पंडितांनाही लावता येत नाही, याचा प्रत्यय आज सोलापूरमध्ये आला. एकीकडे सोलापूर महापालिकेत भाजपने बहुमताचा आकडा गाठला असला तरी, प्रभाग क्रमांक २ च्या निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण इथे एका उमेदवाराने (Shalan Shinde) चक्क तुरुंगात असताना निवडणूक जिंकली आहे.

Shalan Shinde Solapur Municipal Corporation

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग २ मध्ये मनसेचे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. त्यामुळे येथे Solapur Municipal Corporation च्या निवडणुकीत ‘राजकारण चांगलंच तापलं’ होतं. या प्रभागात भाजपचे दिग्गज आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र Kiran Deshmukh हे देखील मैदानात होते. त्यांनी शिवसेनेच्या गणेश कुलकर्णी यांचा तब्बल ११ हजार मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

मात्र, खरी ‘खळबळ’ उडाली ती याच पॅनलमधील भाजपच्या दुसऱ्या उमेदवार शालन शिंदे यांच्या विजयामुळे. शालन शिंदे या सध्या बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत. त्या प्रचारालाही उपलब्ध नव्हत्या. तरीही, जनतेने त्यांना भरभरून मतदान केले आणि त्या सुमारे ४ हजार मतांनी विजयी झाल्या. खुनाच्या घटनेनंतरही मतदारांवर कोणताही भावनिक परिणाम झाला नसल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. भाजपने या प्रभागातील चारही जागा जिंकून विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे.

दुसरीकडे, या निकालावर मनसेकडून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आली आहे. मनसेचे प्रशांत इंगळे यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, “ही लोकशाहीची आणि संविधानाची हत्या आहे. उमेदवार तुरुंगात असूनही निवडून येतो, हे पैसे आणि सत्तेच्या जोरावर घडलंय.” तुरुंगातील उमेदवार निवडून आल्याने सोलापुरात विजयाच्या जल्लोषासोबतच नैतिकतेच्या चर्चेलाही उधाण आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही