Share

IND vs NZ: ‘तोच जगातील नंबर 1 स्पिनर…’, ८२ धावा देणाऱ्या कुलदीपच्या पाठीशी उभा राहिला ‘हा’ जिगरी दोस्त!

राजकोटमध्ये कुलदीप यादवने ८२ धावा दिल्यामुळे त्याला ट्रोल केले जात होते, पण युझवेंद्र चहलने त्याला जगातील बेस्ट स्पिनर म्हणत पाठीशी घातले आहे.

Published On: 

Yuzvendra Chahal backs Kuldeep Yadav: ८२ धावा देणाऱ्या कुलदीपसाठी चहल मैदानात

क्रिकेटच्या मैदानात कधी काय होईल, हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. कालपर्यंत ज्याच्या फिरकीची जादू जगावर चालत होती, त्याच गोलंदाजाची राजकोटमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अक्षरशः पिसे काढली. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर १४ जानेवारीला झालेल्या दुसऱ्या वनडेत भारताचा चायनामन स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याची अवस्था बघवत नव्हती.

न्यूझीलंडच्या डॅरेल मिशेलने त्याला असं काही झोडपून काढलं की, कुलदीपच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. पण वाईट काळात जो साथ देतो, तोच खरा मित्र! सोशल मीडियावर कुलदीपला ट्रोल केलं जात असतानाच त्याचा जुना जोडीदार युझवेंद्र चहल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.

Yuzvendra Chahal backs Kuldeep Yadav

भारताने दिलेल्या २८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात तशी अडखळत झाली होती. हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णाने सलामीवीरांना माघारी धाडलं होतं. कॅप्टन शुभमन गिलला अपेक्षा होती की मधल्या ओव्हर्समध्ये कुलदीप यादव मॅच फिरवेल. पण झालं भलतंच! डॅरेल मिशेल (१३१*) आणि विल यंग (८७) यांनी कुलदीपला टार्गेट केलं.

कुलदीपने १० षटकात तब्बल ८२ धावा लुटवल्या आणि फक्त १ विकेट मिळवली. वनडे करिअरमध्ये ८० हून अधिक धावा देण्याची ही त्याची तिसरी वेळ ठरली.

एकीकडे चाहत्यांनी कुलदीपच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असताना, पंजाब किंग्सचा लेग स्पिनर आणि कुलदीपचा खास दोस्त युझवेंद्र चहलने मोठं विधान केलं आहे. एका खराब दिवसामुळे खेळाडूचं महत्त्व कमी होत नसतं, हे सांगताना चहलने म्हटलंय की, “कुलदीप यादव हाच तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील नंबर १ स्पिनर आहे.” चहलच्या या विधानामुळे ‘कुलचा’ जोडीतलं प्रेम पुन्हा एकदा दिसून आलंय.

दरम्यान, न्यूझीलंडने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता १८ जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर ‘करो या मरो’ अशी फायनल मॅच रंगणार आहे. आता तिसऱ्या वनडेत कुलदीप जोरदार कमबॅक करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही