Share

निशा परुळेकर यांचा ‘काटाकिर्र’ विजय; ठाकरेंच्या नेत्याचा गेम ओव्हर, भाजपचा गुलाल उधळला!

प्रसिद्ध अभिनेत्री निशा परुळेकर यांनी प्रभाग क्रमांक २५ मधून ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.

Published On: 

Nisha Parulekar BJP Win: अभिनेत्रीने ठाकरेंचा उमेदवार पाडला, भाजपचा मोठा विजय

🕒 1 min read

मुंबई – राजकारणाच्या सारीपाटावर कधी कोण कोणाला चितपट करेल, हे भल्याभल्या चाणक्यांनाही सांगता येत नाही. काल नेमका असाच काहीसा प्रकार मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या २९ महानगरपालिकांच्या मतमोजणीत कांदिवलीतून एक अत्यंत धक्कादायक निकाल समोर आला आहे. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेल्या मराठमोळ्या अभिनेत्री निशा परुळेकर यांनी राजकारणाच्या आखाड्यातही आपण ‘कच्च्या लिंबू’ नसल्याचं सिद्ध केलंय.

Nisha Parulekar BJP Win

कांदिवली आणि ठाकूर व्हिलेजचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये आज भाजपने विजयाचा गुलाल उधळला. विशेष म्हणजे, निशा परुळेकर यांनी थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिग्गज उमेदवार योगेश भोईर यांना पराभवाची धूळ चारली आहे. भोईर हे या भागातील अनुभवी चेहरा मानले जातात, पण निशा यांच्या ‘स्टार पॉवर’ आणि जनसंपर्कासमोर त्यांचा निभाव लागला नाही.

निशा परुळेकर यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा महायुतीमध्ये काही प्रमाणात नाराजीचे सूर होते. “बाहेरच्या सेलिब्रिटीला तिकीट कशाला?” अशी कुजबूज सुरू होती. मात्र, निशा यांनी या विरोधाला न जुमानता थेट मतदारांच्या दारात जाणं पसंत केलं. त्यांनी प्रचारात घेतलेली आघाडी आणि विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांचं पाठबळ, यामुळे हे समीकरण जुळून आल्याची चर्चा आता रंगली आहे.

दुसरीकडे, ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. योगेश भोईर यांच्यासारखा तगडा उमेदवार पडल्याने या भागात राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत. निशा परुळेकर या सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. त्यांनी आपल्या कामाचा धडाका आणि अभिनयाची लोकप्रियता यांचं योग्य कॉम्बिनेशन करत हा विजय खेचून आणला आहे.

या विजयामुळे आता एका अभिनेत्रीचा थेट कॉर्पोरेटर म्हणून प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या प्रभागातील प्रश्न कसे सोडवतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या तरी कांदिवलीत फक्त निशा परुळेकर (Nisha Parulekar) यांच्या विजयाचीच चर्चा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!