🕒 1 min read
मुंबई– मुंबईच्या रस्त्यांवर आज भल्या पहाटे जे चित्र दिसलं, ते पाहून कोणालाही थक्क व्हायला होईल. एरव्ही गाड्यांच्या हॉर्नने दणाणून जाणारी मुंबई आज ‘रन फॉर हेल्थ’च्या घोषणेने दुमदुमली होती. निमित्त होतं मुंबई मॅरेथॉनचं! (Mumbai Marathon 2026) तब्बल ६५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी आज रस्त्यावर उतरून आपल्या फिटनेसची चुणूक दाखवली. विशेष म्हणजे, यंदा धावपटूंना अथांग समुद्राच्या सोबतीने कोस्टल रोडवरून धावण्याची ‘गोल्डन’ संधी मिळाली.
Mumbai Marathon 2026 Updates
या मॅरेथॉनमध्ये सामान्य मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, काही सेलिब्रिटी चेहऱ्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान चक्क आपल्या संपूर्ण कुटुंबासह या शर्यतीत उतरला. “आज सहकुटुंब धावताना खूप भारी वाटतंय. प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी वेळ काढलाच पाहिजे,” असा सल्ला आमिरने यावेळी दिला. गंमत म्हणजे, पत्रकारांनी जेव्हा त्याला मुंबई महापालिका निकालावर छेडलं, तेव्हा “मी निकाल पाहिला नाही, तुम्हालाच माहित,” असं म्हणत त्याने अतिशय सफाईदारपणे राजकीय प्रश्नावर ‘नो कॉमेंट्स’चा पवित्रा घेतला.
तसेच राजकीय वर्तुळातून एक सरप्राईज एन्ट्री झाली ती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची. माहीमपासून हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना त्यांनी मुंबईच्या बदलत्या रूपाचं कौतुक केलं. “मी मुंबईत तीन वर्षे राहिलोय, पण कोस्टल रोडसारखं काही बनेल असं वाटलं नव्हतं. हा बदल सुखावणारा आहे,” अशा शब्दांत त्यांनी पायाभूत सुविधांची स्तुती केली. भाजपच्या महापालिका विजयावर बोलताना, “जिंकणाऱ्यांवर आता लोकांच्या आशा पूर्ण करण्याची जबाबदारी आहे,” असा सूचक टोलाही त्यांनी लगावला.
सकाळी ५ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत मुख्य शर्यतीला सुरुवात झाली, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘ड्रीम रन’ला हिरवा झेंडा दाखवला. या शर्यतीसाठी एकूण ३.५४ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम असल्याने धावपटूंमध्ये चुरस पाहायला मिळाली. सीएसएमटीवरून सुरू झालेला हा मानवी सागर बघून मुंबईची ‘स्पिरीट’ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Police Election Duty: ७२ तास ड्युटी, फक्त ५०० रुपये? संतापलेल्या पोलिसाने केला ‘हा’ धक्कादायक प्रकार!
- दुखापतीमुळे कोणाचं नुकसान, कोणाचा फायदा? टीम इंडियात ‘या’ दोन वाघांची अचानक एन्ट्री!
- Gold Rate : सोनं भडकलं! 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











