Share

रवीना टंडनने शिवसेनेसाठी घाम गाळला, पण मतदानालाच दांडी; अचानक असं काय घडलं?

रवीना टंडनने शिवसेनेसाठी गल्लीबोळात फिरून प्रचार केला, पण मतदानाच्या दिवशी ती अचानक गायब झाली. यामागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.

Published On: 

Raveena Tandon BMC News: शिवसेनेचा प्रचार, पण मतदानाला दांडी; रवीना टंडनबद्दल मोठी बातमी

Raveena Tandon- प्रचार करायला सर्वात पुढे, पण बटण दाबायच्या वेळी मात्र गायब… असं जर कोणी वागलं तर चर्चा तर होणारच ना? सध्या मुंबईत हेच घडलंय. अभिनेत्री रवीना टंडन सध्या याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. तिने शिवसेनेच्या (ठाकरे गट) उमेदवारासाठी मुंबईच्या गल्लीबोळात फिरून जोरदार प्रचार केला, पण मतदानाच्या दिवशी मात्र ती स्वतःच गैरहजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वांद्रे पश्चिममधील वॉर्ड १०१ मधील शिवसेनेच्या उमेदवार अक्षता मेनेझेस यांच्यासाठी रवीनाने अक्षरशः रान उठवलं होतं. गळ्यात ‘मशाल’ चिन्हाचा स्कार्फ, साध्या कुर्त्यात वावर आणि चिंबई ते कांठवाडीपर्यंत काढलेली ती भव्य पदयात्रा… हे सगळं पाहून शिवसैनिकांमध्येही वेगळाच उत्साह संचारला होता. रवीनाने घरोघरी जाऊन मतदानाचं आवाहन केलं होतं. त्यामुळे मतदानाच्या दिवशी ती सकाळीच बुथवर हजेरी लावेल, अशी सर्वांना खात्री होती.

Raveena Tandon Misses Voting

मात्र, गुरुवारी जेव्हा मतदानाची वेळ आली, तेव्हा रवीना टंडन चक्क मुंबईत नव्हतीच! सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीना मतदानाचा हक्क न बजावताच परदेशात रवाना झाली होती. आता तिने असं का केलं? यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पण “रवीनाला अचानक एका ‘कौटुंबिक आपत्कालीन’ (Family Emergency) परिस्थितीमुळे तातडीने परदेशी जावं लागलं.” त्यामुळे इच्छा असूनही ती मतदान करू शकली नाही, असं बोललं जात आहे.

दुसरीकडे, फक्त रवीनाच नाही, तर शाहरुख खान, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक बड्या स्टार्सनी मतदानाला दांडी मारल्याचं चित्र होतं. पण रवीनाचं प्रकरण जास्त गाजलं कारण तिने स्वतः रस्त्यावर उतरून प्रचार केला होता.

सध्या समोर येत असलेल्या कलांनुसार, मुंबई महापालिकेत भाजपने मुसंडी मारली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती असूनही मतदारांवर त्याचा फारसा प्रभाव पडल्याचं दिसत नाही. पण रवीनाच्या या ‘प्रचार जोरात आणि मतदान कोमात’ या प्रकाराची सोशल मीडियावर मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही