Dhananjay Deshmukh । दादा खिंडकर (Dada Khindkar) हा दिवंगत संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा साडू आहे. काही दिवसांपूर्वी दादा खिंडकर याचा मारहाण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
अशातच आता दादा खिंडकरबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दादा खिंडकर याला रात्रीच बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किडनी स्टोनच्या आजारामुळे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
जर त्याच्या प्रकृतीत आज सुधारणा झाली तर त्याला त्याची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत होईल. दरम्यान, दादा खिंडकर याला वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि इतर आरोपींकडून जीवाला धोका असल्याचे पत्र अश्विनी खिंडकर यांनी कारागृह अधिक्षकांना दिले आहे.
दादा खिंडकर आणि वाल्मिक कराड हा बरॅक क्रमांक २ मध्ये असल्याचे पत्नी अश्विनी खिंडकर (Ashwini Khindkar) यांनी सांगितले. त्यामुळे माझ्या पतीच्या जिवाला धोका असल्याची भीती अश्विनी खिंडकर यांनी व्यक्त केली आहे.
Dada Khindkar wife Ashwini Khindkar letter to Superintendent of Jails
त्यामुळे माझ्या पतीला इतर ठिकाणी हलवावे आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी अश्विनी मागणी खिंडकर यांच्याकडून कारागृह अधीक्षक यांना करण्यात आली आहे. त्यांची ही मागणी मान्य होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :