धनंजय देशमुखांवरील ‘तो’ गुन्हा खोटा? समाधान खिंडकरच्या बनावामुळे बीडमध्ये मोठी खळबळ

बीडमध्ये धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांनी दिलेली शस्त्राचा धाक दाखवल्याची तक्रार पोलिसांच्या तपासात आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे पूर्णपणे खोटी ठरली आहे.

Published On: 

Beed CCTV Footage showing Dhananjay Deshmukh and Samadhan Khindkar hotel incident investigation.

बीड- जुन्या वैमनस्यातून थेट खोट्या गुन्ह्यांचा बनाव कसा रचला जातो? बीडमध्ये (Beed) नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेने असाच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. बंदूक रोखून जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा हा संपूर्ण थरार फक्त कागदावरच होता हे आता स्पष्ट झालं आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. समाधान खिंडकर याने ही तक्रार केली होती. पण पोलिसांनी केलेल्या तपासात ही तक्रार आणि देशमुखांनी दिलेली क्रॉस तक्रार या दोन्ही पूर्णपणे खोट्या असल्याचं उघड झालं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाहून परतताना धनंजय देशमुख बीडजवळील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. तिथे समाधान खिंडकर देखील आपल्या मित्रांसोबत होता. मोबाईल हिसकावल्याच्या कारणावरून देशमुखांनी आपल्या कानाला थेट बंदूक लावली असा दावा समाधानने केला होता.

त्यामुळेच या प्रकरणात देशमुखांवर गुन्हा दाखल झाला होता. दुसरीकडे धनंजय देशमुखांनीही समाधान आणि त्याच्या साथीदारांवर आपल्याला शस्त्राचा धाक दाखवल्याचा प्रतिगुन्हा दाखल केला होता. या हायव्होल्टेज प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक व्यंकटराम यांनी स्वतः तपास सुरू केला. पोलिसांनी ३० मे रोजी रात्री १० ते १२ वाजेदरम्यानचे सर्व सीसीटीव्ही फुटेज अतिशय बारकाईने तपासले. यात बंदूक रोखल्याची किंवा मारहाणीची कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या कौटुंबिक आणि न्यायालयीन वादातून हा सगळा बनाव रचला गेला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या स्वतःच्या सख्ख्या भावाला समाधान खिंडकरने आधीच धमकी दिली होती. आता खोट्या तक्रारी देऊन यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी पोलीस थेट न्यायालयात अहवाल देणार आहेत.

या सगळ्या घडामोडींनंतर बीडमधील राजकारण पुन्हा तापलं आहे. आपण या संपूर्ण प्रकरणाबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही