🕒 1 min read
बीड | बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात शिवराज दिवटे या तरुणावर गुन्हेगारी टोळक्यांनी केलेल्या अमानुष मारहाणीप्रकरणी राजकारण तापले आहे. याच घटनेनंतर करुणा मुंडे यांनी थेट धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
धनंजय मुंडे गुन्हेगारांना पाठीशी घालतात, असा ठपका ठेवत करुणा मुंडे म्हणाल्या, “बीड जिल्ह्यात आज जे गुन्हेगारी टोळक्यांचे राज्य आहे, त्यामागे मुंडे बंधु-भगिनींचा हात आहे. संपूर्ण बीडमध्ये आठ ते दहा हजार गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. यांच्यावर कारवाई न करता त्यांना राजकीय पाठबळ दिलं जातंय.”
Karuna Munde accused Dhananjay and Pankaja Munde
‘ऑपरेशन सिंदूर’ बीडमध्येही हवे – अशा मागणीसह त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांना पत्र लिहिले आहे. “जसं देशात दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर चालवण्यात आलं, तसं बीडच्या गुन्हेगारांविरोधातही चालवा. एन्काउंटर हा एकमेव उपाय आहे,” असं त्यांनी ठामपणे म्हटलं.
करुणा मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनाही या गुन्हेगारी साखळीत जबाबदार धरलं. “पंकजा आणि धनंजय हे दोघंही एका माळेचे मणी आहेत. दोघांनी बीडच्या लोकांना फक्त गुंडांकडे ढकललं आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.
अजित पवारांवरही टीका करत त्यांनी विचारलं, “जे पुण्यात गुन्हे थांबवू शकले नाहीत, ते बीडमध्ये काय थांबवणार?” मंत्रीपदाविषयी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडेंकडून काढून घेतलेले मंत्रिपद, बीडमधील इतर आमदाराला द्यावं. अन्यथा मी पुन्हा लढा उभारेल.”
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान, आरक्षण गमावलं – गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप
- संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड न्यायालयात सुनावणी; धनंजय देशमुख म्हणाले..!
- महाराष्ट्रात सरन्यायाधीशांचा अपमान? गवईंच्या नाराजीनंतर अधिकाऱ्यांकडून उशिरा दिलगिरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now