🕒 1 min read
लातूर | मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. लातूरमध्ये माध्यमांशी बोलताना सदावर्ते म्हणाले की, “मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. ईडब्लूएस (आर्थिक दुर्बल घटक) अंतर्गत मिळणारे आरक्षण आता कमी झालं असून, पाच टक्क्यांपेक्षा कमी मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे.”
सदावर्ते म्हणाले, “मनोज जरांगे यांचा हट्ट समाजासाठी अडचण ठरत आहे. आधी आठ टक्के आरक्षण मिळत होतं, आता तेही गेलं. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनाही याचा फटका बसतो आहे.”
Gunratna Sadavarte Blames Manoj Jarange
ते पुढे म्हणाले की, “मनोज जरांगे हे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखे आहेत. निवडणुकांच्या वेळेसच ते दिसतात. त्यांच्या चुळबुळीचा कालखंड पुन्हा सुरु झाला आहे. ते कोणाच्या तरी राजकीय पाठबळावर काम करत आहेत. लवकरच त्यांच्या गाड्या वाढतील, प्रचार सुरू होईल.”
सदावर्ते यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “राऊत यांचा इस्लामिक विचारांचा जास्त अभ्यास झालेला दिसतो. शरद पवार यांनी त्यांना एवढं महत्त्व का दिलंय, याचा मला प्रश्न पडतो,” असंही ते म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी उपोषणही केलं होतं. त्यानंतर सरकारने शिंदे समितीची स्थापना केली असून ती मराठा कुणबी नोंदी तपासते आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड न्यायालयात सुनावणी; धनंजय देशमुख म्हणाले..!
- महाराष्ट्रात सरन्यायाधीशांचा अपमान? गवईंच्या नाराजीनंतर अधिकाऱ्यांकडून उशिरा दिलगिरी
- “शिष्टमंडळावरून राजकारण नको” – शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now